Lokmat Money > बिझनेस न्यूज > बोलोली सबस्टेशन ठरतोय पांढरा हत्ती....

बोलोली सबस्टेशन ठरतोय पांढरा हत्ती....

* कळे ते बोलोली लाईनचे काम निकृष्ट

By admin | Published: November 1, 2014 09:48 PM2014-11-01T21:48:16+5:302014-11-01T21:48:16+5:30

* कळे ते बोलोली लाईनचे काम निकृष्ट

White elephant due to Bololi substation ... | बोलोली सबस्टेशन ठरतोय पांढरा हत्ती....

बोलोली सबस्टेशन ठरतोय पांढरा हत्ती....

*
ळे ते बोलोली लाईनचे काम निकृष्ट
* कोट्यवधी रुपये खर्चातून उभारलेले सबस्टेशन बंद
* सबस्टेशन बंद असल्याने शेतकरीवर्ग नाराज
* शेतीपंपाचे भारनियमन कमी करण्याची शेतकर्‍यांची मागणी
----------------------
मच्छिंद्र मगदूम
सांगरुळ : बोलोली (ता. करवीर) येथे बारा वाड्यांचा विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून सबस्टेशन सुरू केले आहे. याठिकाणी कळे येथून असगाव सबस्टेशनवरून नवीन विजेची लाईन जोडण्यात आली आहे, पण या लाईनचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून, या लाईनच्या तारांना जोडलेले इन्शोलेशन (चिनी मातीच्या प्लेश) वारंवार फुटत आहेत. परिणामी, लाईन नेहमी बंदच असते. यामुळे बोलोली सबस्टेशन पांढरा हत्ती ठरत आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदारावर कारवाई करून सबस्टेशन तातडीने सुरू करावे, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
महावितरण कंपनीने कळे असगाव येथून २० किलोमीटरनंतर नवीन लाईन टाकून बोलोली येथे ३३ केव्ही सबस्टेशन उभारले. सबस्टेशनच्या मुहूर्तापासून या लाईनमध्ये बिघाड असून गेली दीड वर्षे हे काम महावितरण कंपनीला सुरळीत करता आलेले नाही. सध्या कोगे सबस्टेशनवरून लाईट जोडली आहे, पण यामुळे लोडशेडिंग वाढत आहे. कळे येथून वीजपुरवठा सुरू केल्यानंतर पोलवरील इन्शोलेशन फुटण्याचे सत्र गेले दीड वर्ष सुरू आहे. महावितरण कंपनी यांची ट्रायल आणखी किती वर्षे घेणार अशी विचारणा शेतकरीवर्गांतून होत आहे. गेले तीन महिने हे काम पूर्णपणे बंदच आहे. ही लाईन सुरू करण्याचा प्रयत्न केला तर तासभरसुद्धा लाईन सुरू राहात नाही. यामुळे कळे येथून आणलेली लाईन नेहमी बंदच असते.
विजेचे भारनियमन वाढत असून यामुळे हातातोंडाशी आलेली पिके वाळण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे सबस्टेशन व लाईनच्या कामाची चौकशी व्हावी व शेती पंपासाठी पूर्ण क्षमतेने वीज मिळावी, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांतून जोर धरत आहे.
---------------
प्रतिक्रिया
प्रकाश पाटील (उपसरपंच, आमशी) : बोलोली सबस्टेशनची कळे ते बोलोली लाईनची तातडीने दुरुस्ती करावी, भारनियमन रद्द करून शेतीसाठी १२ तास वीज द्यावी व उपवडे तलावातील पाणी सोडलेल्या वेळेतच वीजपुरवठा करावा अन्यथा परिसरातील शेतकर्‍यांना एकत्र करून तीव्र आंदोलन छेडू.
----------
फोटो ओळ : (फोटो मेल)
बोलोली येथील वादाच्या भोवर्‍यात अडकलेले सबस्टेशन.

Web Title: White elephant due to Bololi substation ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.