Join us

ईव्ही कंपन्यांमध्ये सर्वात दबदबा कुणाचा?; भारतात क्रेझ वाढली, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 5:59 AM

भारतात एकूण ईव्ही विक्रीमध्ये टाटा मोटर्स या एकट्या कंपनीचा वाटा ७० टक्के इतका आहे.

नवी दिल्ली : भारतात सध्या ईव्हींची क्रेझ वाढलेली दिसते. ग्राहक मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक कारकडे वळू लागले आहेत. बड्या ईव्ही निर्मात्या कंपन्याही मोठी बाजारपेठ म्हणून भारताकडे वळू लागल्या आहेत. परंतु आजही ईव्ही निर्मितीत चीनचा प्रचंड दबदबा आहे. टॉप १० कंपन्यांमध्ये चीनच्या चार तर जर्मनीच्या तीन कंपन्यांचा समावेश आहे. या टॉप १० यादीत भारताची एकही कंपनी नाही. 

सर्वाधिक वाटा टेस्लाचा 

ईव्ही निर्मितीत अमेरिकेची टेस्ला ही एकमेव कंपनी आहे. जागतिक बाजारात या कंपनीचा वाटा १९.९ टक्के आहे. मागच्या वर्षी कंपनीने १८ लाख ४५ हजार ९८५ गाड्यांची निर्मिती केली.  चीनची बीवायटी कंपनी दुसऱ्या स्थानी आहे. चौथ्या तिमाहीत कंपनीने टेस्लापेक्षा अधिक गाड्यांचे उत्पादन केले. चीनची जीएससी तिसऱ्या तर एसएआयसी चौथ्या स्थानी आहे. 

भारतीय कंपनीचा वाटा किती? 

भारतात एकूण ईव्ही विक्रीमध्ये टाटा मोटर्स या एकट्या कंपनीचा वाटा ७० टक्के इतका आहे. कंपनीने मागील वर्षात ६६ हजार ईव्हींची विक्री केली. परंतु जागतिक बाजाराचा विचार केला तर या कंपनीचा वाटा एक टक्केइतकाही नाही. भविष्यात या क्षेत्राच्या वाढीसाठी खूप संधी आहेत. 

टॅग्स :इलेक्ट्रिक कार / स्कूटर