Lokmat Money > बिझनेस न्यूज > जगात ‘व्हाइट गोल्ड’चा सर्वाधिक साठा कुणाकडे? ज्या देशाकडे जास्त लिथियम तो ठरणार ‘राजा’

जगात ‘व्हाइट गोल्ड’चा सर्वाधिक साठा कुणाकडे? ज्या देशाकडे जास्त लिथियम तो ठरणार ‘राजा’

जम्मू-काश्मीरपाठोपाठ राजस्थानातही लिथियमचा आढळलेला मोठा साठा खूप मोठी जमेची बाजू आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2023 09:16 AM2023-05-12T09:16:19+5:302023-05-12T09:16:57+5:30

जम्मू-काश्मीरपाठोपाठ राजस्थानातही लिथियमचा आढळलेला मोठा साठा खूप मोठी जमेची बाजू आहे.

Who has the largest stock of 'white gold' in the world? The country which has more lithium will be the 'king'. | जगात ‘व्हाइट गोल्ड’चा सर्वाधिक साठा कुणाकडे? ज्या देशाकडे जास्त लिथियम तो ठरणार ‘राजा’

जगात ‘व्हाइट गोल्ड’चा सर्वाधिक साठा कुणाकडे? ज्या देशाकडे जास्त लिथियम तो ठरणार ‘राजा’

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरपाठोपाठ राजस्थानातही लिथियमचा आढळलेला मोठा साठा खूप मोठी जमेची बाजू आहे. कारण यामुळे इलेक्ट्रिक वाहने तसेच लॅपटॉप आणि मोबाइलसाठी लागणाऱ्या चार्जेबल बॅटरीसाठी लागणाऱ्या लिथियमची देशाची गरज भागणार आहे. यासाठी इतर देशांवर फारसे अवलंबून राहावे लागणार नाही.

भारताकडे लिथियम किती?

फेब्रुवारीत जम्मू काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात लिथियमचा ५.९ मिलियन टन इतका साठा आढळला होता. भारतीय भूगर्भ सर्वेक्षण विभागाच्या दाव्यानुसार राजस्थानमधील साठा जम्मू-काश्मीरमध्ये आढळलेल्या साठ्यापेक्षा मोठा आहे.

‘निकाल’ तर लागला, आता पुढे कोण काय करणार?

उत्पादन खर्च कमी, चालतात दीर्घकाळ

बाजारात लिथियम-आयर्न, सॉलिड स्टेट, निकेल-मेटल हाइड्राइट, लेड-ॲसिड, अल्ट्राकॅपेसिटर, आदी प्रकारच्या रिचार्जेबल बॅटरी मिळतात. यातील लिथियम-आयर्न बॅटरी सर्वांत चांगल्या मानल्या जातात, कारण यांची ऊर्जा साठविण्याची क्षमता जास्त आहे. उच्च तापमानातही या चांगल्या प्रकारे काम करू शकतात. या बॅटरींच्या उत्पादनावर कमी खर्च येतो, तसेच या दीर्घकाळ चालतात.

हा धातू साध्या चाकूने कापता यावे इतका नरम, तर तो पाण्यातही तरंगू शकतो इतका हलका असतो.

रासायनिक ऊर्जा साठवून तिचे विजेत रूपांतर करू शकतो. म्हणूनच ताे चार्जेबल बॅटरीमध्ये वापरला जातो.

१ टन लिथियमची किंमत ५७.३६ लाख रुपये इतकी आहे. यामुळे ज्या देशाकडील लिथियमचा साठा अधिक, त्याला भविष्यात मोठे महत्त्व प्राप्त होणार आहे.
 

Web Title: Who has the largest stock of 'white gold' in the world? The country which has more lithium will be the 'king'.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.