Zomato Deepinder Goyal : झोमॅटोचं नाव तुम्ही ऐकलंच असेल. झोमॅटोचे संस्थापक दीपिंदर गोयल यांचं नावही तुम्ही कधी ना कधी ऐकलं असेल. ते दिल्ली आयआयटीचे माजी विद्यार्थी आहेत. दीपिंदर गोयल यांचा पहिला विवाह कांचन जोशी यांच्यासोबत झाला होता. मात्र नंतर दोघांनीही घटस्फोट घेतला. त्यानंतर काही वर्षांनी त्यांची भेट ग्रेसिया मुनोज हिच्यासोबत झाली. यानंतर त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
दीपिंदर आणि कांचन यांची कहाणी आयआयटी दिल्लीच्या दिवसांपासून सुरू होते. दोघेही मॅथ्स अँड कम्प्युटिंग डिपार्टमेंटमध्ये होते. कांचन या एमएस्सीचं शिक्षण घेत होत्या. लॅब सेशनमध्ये होत असलेल्या भेटीदरम्यान दोघांची जवळीक वाढली. फोर्ब्स इंडियाला दिलेल्या मुलाखतीत दीपिंदर गोयल यांनी आपण सहा महिने कांचन यांचा पाठलाग केल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर दोघांनी डेटिंग सुरू केलं. २००७ मध्ये ते विवाहबंधनात अडकले.
दिल्ली विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक
लग्नाच्या वर्षभरानंतर २००८ मध्ये दीपिंदर गोयल यांनी आपले मित्र पंकज चड्ढा यांच्यासोबत झोमॅटो सुरू केलं. २०१३ मध्ये त्यांची मुलगी सिताराचा जन्म झाला. आम्ही एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेतो. तसंच आपल्यात भांडणही झालेलं नाही, असंही गोयल यांनी त्यांच्या नात्याबद्दल बोलताना सांगितलं होतं.
कांचन जोशी यांनीही स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. त्या दिल्ली विद्यापीठात गणिताच्या सहाय्यक प्राध्यापक आहेत. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून गणितात बीएस्सी, आयआयटी दिल्लीतून एमएससी आणि आयआयटी दिल्लीतून गणितात पीएचडी केली आहे.
अशी झाली ग्रेसियाशी भेट
अनेक वर्षांनी ग्रेसिया मुनोज दीपिंदर यांच्या आयुष्यात आली. ग्रेसिया ही मेक्सिकन मॉडेल होती. दीपिंदर यांची दिल्लीत एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून ग्रेसियाशी भेट झाली. दीपिंदर यांनी 'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो'मध्ये याविषयी सांगितलं. आपण बराच काळ सिंगल होतो. आपले मित्र डेटवर पाठवत असत. पण एका मित्रानं त्यांची ग्रेसियाशी ओळख करून दिल्यानंतर त्यांचं मत बदललं. पुढे दोघांनी लग्न केलं, हे दीपिंदर यांच्या वैयक्तिक आयुष्यातील नवं वळण होतं.
दीपिंदर गोयल यांनी व्यवसाय विश्वात मोठे यश मिळवलं आहे. वैयक्तिक आयुष्यातही त्यांनी खूप गांभीर्य दाखवलं. कांचन जोशी यांच्याशी त्यांचं नातं फार काळ टिकलं नसलं तरी दोघांनीही एकमेकांशी आदराचं आणि सामंजस्याचं नातं जपलं. कांचन यांनी आपल्या शिक्षणात आणि करिअरमध्ये मोठं यश मिळवलं.