Who is : आपल्याकजे नेत्यांपासून ते अभिनेते आणि व्यावसायिकांची मुलं आपल्या खास स्टाईलमुळे चर्चेत असतात. मात्र, आईशा भारती पसरीचा या त्यापैकी नाहीत. अब्जाधीश वडिलांच्या या मुलीनं स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आईशा भारती पसरीचा या देशातील टेलिकॉम टायकून आणि भारती एअरटेलचे संस्थापक सुनील मित्तल यांच्या कन्या आहेत. देशातील बहुतेक हायप्रोफाईल बिझनेसमनच्या मुलांपेक्षा आईशा या अतिशय खासगी आणि लाईमलाईटपासून दूर आयुष्य जगणं पसंत करतात. साडेदहा लाख कोटीरुपयांहून अधिक रकमेच्या व्यावसायिक साम्राज्याच्या वारसदार असूनही व्यवसायात यशस्वी होण्यासाठी त्यांनी स्वत:चा वेगळा मार्ग निवडला.
आईशा यांनी स्वत:ला एक यशस्वी बिझनेसवुमन म्हणून सिद्ध केलं आहे. विशेषत: फॅशन आणि कॉस्मेटिक क्षेत्रात त्यांच्या आवडीच्या व्यवसायात त्यांनी गुंतवणूक केली आहे. आईशा पसरीचा यांची एक प्रसिद्ध गुंतवणूक म्हणजे लक्झरी फॅशन ब्रँड रोक्सांडा. विशेष म्हणजे केट मिडलटन आणि मिशेल ओबामा सारख्या सेलिब्रिटींना हा ब्रँड आवडतो. लंडन स्थित ब्युटीस्टॅकमध्येही त्यांनी गुंतवणूक केली आहे.
कौटुंबिक व्यवसायापेक्षा वेगळा विचार
आईशा भारती पसरीचा यांचा व्यवसायाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कौटुंबिक व्यवसायापेक्षा खूप वेगळा आहे. आईशा यांचे व्यावसायिक निर्णय त्यांच्या वैयक्तिक विश्वास आणि पॅशनवर आधारित असतात. प्रत्येक व्यक्ती स्वत:ची ओळख निर्माण करू शकते, हे यातून दिसून येतं.
पतीसोबत लंडनमध्ये स्थायिक
आईशा भारती यांनी एनिसमोरचे संस्थापक आणि सीईओ शरण पसरीचा यांच्याशी विवाह केलाय. एन्निस्मोर हॉक्स्टन आणि ग्लेनिगल्स सारख्या लक्झरी हॉटेल ब्रँडशी संबंधित आहे. आईशा आणि शरण आपल्या दोन मुलांसह लंडनमध्ये राहतात. विशेष म्हणजे पती-पत्नी दोघेही खूप श्रीमंत असूनही साधी जीवनशैली पसंत करतात.
आईशा भारती पसरीचा यांचे वडील सुनील भारती मित्तल यांची संपत्ती सुमारे १२.९ अब्ज डॉलर (१ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त) आहे. भारतासह जगातील अब्जाधीशांमध्ये त्यांची गणना होते. फोर्ब्सच्या २०२५ च्या जागतिक अब्जाधीशांच्या यादीत ते १७४ व्या स्थानावर आहेत.