Join us

कोण आहेत GQG चे राजीव जैन?; ज्यांनी अदानींना संकटात दिला १५ हजार कोटींचा 'आधार'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2023 2:29 PM

राजीव जैन हे जीक्यूजी पार्टनर्सचे चेअरमन आणि मुख्य गुंतवणूकदार अधिकारी आहेत.

मुंबई - अदानी समूहाच्या प्रवर्तकांनी अमेरिकेतील ग्लोबल इक्विटी-इन्व्हेस्टमेंट फर्म GQG पार्टनर्सला तब्बल १५,४४६ कोटी रुपयांची भागीदारी विकली आहे. २४ फेब्रुवारी रोजी अदानी समूहाबाबत हिंडेनबर्ग रिसर्चचा रिपोर्ट आल्यानंतर अदानींचे सर्व शेअर्स कोसळले होते. आता GQG च्या गुंतवणुकीच्या वृत्तानंतर अदानींच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. संकटकाळात अदानी समुहाला मदतीचा हात देणाऱ्या नावांमध्ये एक चर्चित नाव म्हणजे राजीव जैन. 

राजीव जैन हे जीक्यूजी पार्टनर्सचे चेअरमन आणि मुख्य गुंतवणूकदार अधिकारी आहेत. ते GQG साठी गुंतवणुकीची रणनीती आखतात. जीक्यूजीच्या आधी ते वॉनटोबेल एसेट मॅनेजमेंटचे चीफ इन्वेस्टमेंट ऑफिसर म्हणून काम करायचे. १९९४ पासून त्यांनी पॉर्टफोलिआ बनवण्याचं काम सुरू केले. राजीव जैन यांच्या नेतृत्वात GQG ने गुंतवणूक क्षेत्रात ९२ अब्ज डॉलरचं पॉवरहाऊस बनले आहे. 

राजीव जैन यांनी २०१६ मध्ये केली GQG ची सुरुवात राजीव जैन यांचा जन्म भारतात झाला परंतु १९९० मध्ये ते अमेरिकेत गेले. त्याठिकाणी मियामी यूनिवर्सिटी MBA ची पदवी घेतली. १९९४ मध्ये वॉनटोबेल कंपनीत कामाला सुरुवात केली. तिथे २००२ पर्यंत ते कंपनीचे चीफ इन्वेस्टमेंट मॅनेजर बनले. २०१६ मध्ये राजीव जैन यांनी GQG ची सुरुवात केली. त्यांनी २०२१ मध्ये ऑस्ट्रेलियात IPO लॉन्च केला होता त्यात ८९३ मिलियन डॉलर जमा केले होते. 

मागील आठवड्यात गुरुवारी अदानी समुहाने सांगितले की, GQG ने १५४४६ कोटी रुपयांना अदानी समुहाच्या ४ कंपन्यांची भागीदारी विकत घेतली आहे. त्यामुळे अदानीच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. अदानींजवळ शानदार Assets आहेत. चांगली वॅल्यूएशन आहे. मागील ५ वर्षापासून अदानींच्या शेअरवर माझी नजर होती परंतु तेव्हा ते महाग होते. अदानी समुहातील गुंतवणूक सकारात्मक ठरेल असा विश्वास वाटतो. भारतात २५ टक्के हवाई वाहतूक अदानी समुहाकडून संचालित विमानतळांवरून होते. कार्गो वॉल्यूममध्ये २५-४० टक्के भागीदारी अदानी समुहाची कंपनी अदानी पोर्ट्सची आहे असं राजीव जैन यांनी म्हटलं. 

तेल, तंबाखू आणि बँकिंगसारख्या व्यवसायात करतात गुंतवणूकजैन यांच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, राजीव जैन हे GQG च्या लाँग-ओन्ली इक्विटी स्ट्रॅटेजीजसाठी पोर्टफोलिओ मॅनेजर आणि विश्लेषक म्हणूनही काम करतात. तेल, तंबाखू आणि बँकिंग यांसारख्या पारंपारिक व्यवसायांमध्ये त्यांचे बहुतेक यशस्वी गुंतवणूकी आहेत.  

टॅग्स :शेअर बाजारअदानी