Join us  

Manasi Tata: कोण आहेत मानसी टाटा? ज्यांच्याकडे सोपवण्यात आली Innova तयार करणाऱ्या कंपनीची जबाबदारी, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 11:50 AM

Kirloskar New Director Manasi: 32 वर्षीय मानसी यांनी युनायटेड स्टेटमधील रोड आयलँड स्कूल ऑफ डिझायनिंगमधून पदवीचे शिक्षण घेतले आहे.

मानसी टाटा यांच्याकडे किर्लोस्कर समूहाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांची किर्लोस्कर जॉइंट व्हेंचर बोर्डाच्या चेअरमनपदी नियुक्त करण्यात आली आहे. हा निर्णय गेल्या महिन्यात विक्रम किर्लोस्कर (Vikram Kirloskar) यांच्या निधनानंतर, घेण्यात आला आहे. मानसी विक्रम या किर्लोस्करांच्या कन्या असण्याबरोबरच टाटा कुटुंबाच्या सूनही आहेत.

मानसी या पूर्वीपासूनच समूहाच्या मॅनेजिंग डायरेक्टर, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आणि सीईओ पदावर काम करत होत्या. आता त्या टोयोटा मटेरियल हँडलिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, किर्लोस्कर टोयोटा टेक्सटाइल प्रायव्हेट लिमिटेड, टोयोटा इंजिन इंडिया लिमिटेड आणि इतर कंपन्यांचे नेतृत्व करतील. तसेच त्यांची आई गीतांजली किर्लोस्कर (Geetanjali Kirloskar) किर्लोस्कर सिस्टिम प्रायव्हेट लिमिटेडच्या चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. तर जाणून घेऊयात कोण आहेत मानसी टाटा.

US मधून ग्रॅज्युएट, NGO ही चालवतात -32 वर्षीय मानसी यांनी युनायटेड स्टेटमधील रोड आयलँड स्कूल ऑफ डिझायनिंगमधून पदवीचे शिक्षण घेतले आहे. त्या केअरिंग विथ कलर नावाचा एक NGO देखील चालवतात. त्यंना पेंटिंग शिवाय, स्विमिंगचाही छंद आहे. ग्रॅज्युएशन संपल्यानंतर त्यांनी वडिलांची कंपनीच जॉइन केली होती. वर्ष 2019 मध्ये त्यांचे लग्न नोएल टाटा (Noel Tata) यांचा मुलगा नेविल टाटा (Neville Tata) यांच्याशी झाला.

त्यांचा विवाह अत्यंत साध्यापद्धतीने पार पडला. या लग्नाला फार मोजके लोकच उपस्थित होते. हे दोन्ही कुटुंब फार पूर्वीपासूनच एकमेकांना ओळखतात. नोएल हे रतन टाटा यांचे सावत्र भाऊ  आहेत. टाटा समूहाची रिटेल कंपनी ट्रेंट लिमिटेडचे (Trent Limited) नेतृत्व नोएल यांच्याकडे आहे. 

टॅग्स :टाटावाहनकार