Lokmat Money > बिझनेस न्यूज > कोण आहेत मेहरबाई? TATA च्या बुडत्या कंपनीला वाचवण्यासाठी गहाण ठेवला कोहिनूरपेक्षाही मोठा हिरा

कोण आहेत मेहरबाई? TATA च्या बुडत्या कंपनीला वाचवण्यासाठी गहाण ठेवला कोहिनूरपेक्षाही मोठा हिरा

जेव्हा हिऱ्यांचा विचार केला जातो तेव्हा सर्वात पहिले नाव डोळ्यासमोर येते ते म्हणजे कोहिनूर.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 07:51 PM2023-05-24T19:51:49+5:302023-05-24T19:52:39+5:30

जेव्हा हिऱ्यांचा विचार केला जातो तेव्हा सर्वात पहिले नाव डोळ्यासमोर येते ते म्हणजे कोहिनूर.

Who is Meherbai A diamond bigger than Kohinoor was mortgaged to save TATA s sinking company know story behind that | कोण आहेत मेहरबाई? TATA च्या बुडत्या कंपनीला वाचवण्यासाठी गहाण ठेवला कोहिनूरपेक्षाही मोठा हिरा

कोण आहेत मेहरबाई? TATA च्या बुडत्या कंपनीला वाचवण्यासाठी गहाण ठेवला कोहिनूरपेक्षाही मोठा हिरा

जेव्हा हिऱ्यांचा विचार केला जातो तेव्हा सर्वात पहिले नाव डोळ्यासमोर येते ते म्हणजे कोहिनूर. पण भारतीयांकडे त्याहूनही मोठे हिरे होते. दोराबजी टाटा (Dorabji Tata) यांनी त्यांची पत्नी मेहरबाई (Meherbai) यांना कोहिनूरपेक्षा दुप्पट मोठा हिरा भेट म्हणून दिला होता. ज्युबली डायमंड (Jubilee Diamond) असं या हिऱ्याचं नाव आहे. या हिऱ्याची कथाही रंजक आहे. 1895 साली दक्षिण आफ्रिकेतील जेजरफॉन्टेन खाणीतून मिळालेला हा हिरा जगातील सहाव्या क्रमांकाचा मोठा हिरा आहे. हाच हीरा गहाण ठेवून टाटा स्टीलला वाचवण्यात आलं होतं. ही एका खऱ्या आयुष्याच्या जोडीदाराची कहाणी आहे. 

एक काळ असा होता की, टाटा समूहातील एक कंपनी अगदी बंद करण्याची वेळ आली होती. पैशांची मोठी चणचण भासत होती. कर्मचाऱ्यांचे पगार थकले होते. काय करावे हे काहीच सूचत नव्हते. एका यशस्वी पुरुषाच्या मागे नेहमी महिलेचा हात असतो असे बोलले जाते. हीच गोष्ट देशातील प्रसिद्ध उद्योगपतींपैकी एक टाटांच्या यशामागे तंतोतंत ठरली. लेडी मेहरबाई टाटा यांनी टाटा ग्रुपच्या वाईट काळात आपले स्त्रीधन गहाण ठेवले होते. एकेकाळी टाटा ग्रुपची एक कंपनी आर्थिक संकटात होती. ती म्हणजे TATA Steel. त्यावेळी लेडी मेहरबाई टाटा यांनी या कंपनीला वाईट काळातून बाहेर काढले. मेहरबाई यांनी दागिने बँकेत गहाण ठेवून पैसे जमवले आणि टाटा स्टीलला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

प्रसिद्ध लेखक हरीश भट्ट यांनी आपल्या Tata Stories: 40 Timeless Tales To Inspire You पुस्तकात लेडी मेहरबाई यांनी टाटा स्टीलला संकटातून कसे बाहेर काढले याबाबत सविस्तर लिहिले आहे. जमशेदजी टाटा यांचे मोठे पुत्र सर दोराबजी टाटा यांच्या त्या पत्नी होत्या. सर दोराबजी टाटा यांनी आपल्या पत्नीसाठी लंडनच्या व्यापाऱ्याकडून २४५.३५ कॅरेट हिरा खरेदी केला होता. हा हिरा इतका महागडा होता, की याची १९०० च्या दशकात किंमत जवळपास १,००,००० पौंड्स होती. पण नंतर पडत्या काळात १९२४ मध्ये अशी वेळ आली, की लेडी मेहरबाई यांना आपला मौल्यवान हिरा विकण्याचा निर्णय घ्यावा लागला.

या काळात टाटा स्टीलकडे पैशांची अतिशय चणचण होती. कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासाठीचेही पैसे नव्हते. त्यावेळी लेडी मेहरबाई पुढे आल्या आणि त्यांनी जुबली डायमंडसह आपली संपत्ती बँकेत गहाण ठेवली. लेडी मेहरबाई यांच्या या निर्णयानंतर टाटा स्टीलने यशाची नवी शिखरे गाठली. आज टाटा ग्रुपच्या या कंपनीचे नाव देशासह जगभरात प्रसिद्ध आहे. त्यानंतर हा हिरा विकून सर दोराबजी टाटा ट्रस्टची निर्मिती करण्यात आली. टाटा स्टील कंपनीवर इतके मोठे संकट येऊनही त्यांनी कंपनीतून कर्मचाऱ्यांना कमी केले नव्हते. तसेच त्यांचे पगारही दिले.

Web Title: Who is Meherbai A diamond bigger than Kohinoor was mortgaged to save TATA s sinking company know story behind that

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.