Join us  

Radhika Merchant : कोण आहेत राधिका मर्चंट? जाणून घ्या अंबानी कुटुंबातील नव्या सदस्याबद्दल सर्व माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2024 3:25 PM

Who is Radhika Merchant: आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या कुटुंबात एका नव्या सदस्याची एन्ट्री होणार आहे. राधिका मर्चंट या लवकरच अंबानी कुटुंबाच्या सदस्य होणार आहेत.

Who is Radhika Merchant: आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या कुटुंबात एका नव्या सदस्याची एन्ट्री होणार आहे. राधिका मर्चंट या लवकरच अंबानी कुटुंबाच्या सदस्य होणार आहेत. नीता आणि मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी यांच्याशी त्यांचा विवाह होणार आहे. राधिका आणि अनंत यांनी जानेवारी २०२३ मध्ये साखरपुडा केला होता आणि १२ जुलै २०२४ रोजी त्यांचं लग्न होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया कोण आहेत राधिका मर्चंट?

राधिका मर्चंट एनकोर हेल्थकेअरचे संस्थापक वीरेन मर्चंट आणि शैला मर्चंट यांच्या कन्या आहेत. त्यांचा जन्म १८ डिसेंबर १९९४ रोजी झाला. राधिका मर्चंट यांनी आपलं शालेय शिक्षण कॅथेड्रल अँड जॉन कॉनन स्कूल, इकोल मोंडियाल वर्ल्ड स्कूलमधून पूर्ण केलं. बी. डी. सोमाणी इंटरनॅशनल स्कूलमधून त्यांनी इंटरनॅशनल बॅकलॉरिएटमध्ये डिप्लोमा केला आहे.

किती झालंय शिक्षण?

त्यांनी न्यूयॉर्क विद्यापीठातून राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयात पदवी घेतली आहे. राधिका या कॉलेजमध्ये असताना देसाई अँड दिवाणजी आणि इंडिया फर्स्ट ऑर्गनायझेशन सारख्या संस्थांशी जोडल्या गेल्या होत्या. ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर त्या आलिशान घरे उभारणाऱ्या इस्प्रवा या रिअल इस्टेट एजन्सीमध्ये रुजू झाल्या.

राधिका एक प्रोफेशनल क्लासिकल डान्सर देखील आहेत. मुंबईतील श्री निभा आर्ट्स डान्स अॅकॅडमीमध्ये गुरुभवन ठाकर यांच्याकडून त्यांनी भरतनाट्यमचं प्रशिक्षण घेतलंय. नीता आणि मुकेश अंबानी यांनी राधिका यांच्यासाठी अरंगेत्रमचं सूत्रसंचालन केलं. अरंगेत्रम पदवीदान समारंभासारखाच असतो. राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांचा साखरपुडा सोहळा राजस्थानमधील श्रीनाथजी मंदिरात पार पडला होता. लग्नापूर्वी अंबानी कुटुंबीय त्यांच्या जामनगर परिसरात तीन दिवसांचा भव्य कार्यक्रम आयोजित करत आहेत.

कोण आहेत त्यांचे आई-वडील?

राधिका मर्चंट यांचे वडील वीरेन मर्चंट एनकोर हेल्थकेअरचे सीईओ आणि स्टील मॅन्युफॅक्चरिंग कंपनी एपीएल अपोलो ट्यूब्सचे बोर्ड मेंबर आहेत. राधिका यांची आई शैला एनकोर हेल्थकेअरच्या संचालिका आहेत. राधिका एनकोर हेल्थमध्ये संचालक पदही भूषवत आहेत आणि प्राणी कल्याण, नागरी हक्क, शिक्षण, आरोग्य, मानवी हक्क, आर्थिक सक्षमीकरण आणि समाजसेवा या विषयांमध्येही त्या सेवा बजावत आहेत.

टॅग्स :मुकेश अंबानीअनंत अंबानी