Lokmat Money > बिझनेस न्यूज > ज्या कंपनीत केली पहिली नोकरी, आता तिचेच बनले बॉस; TCS च्या नव्या CEO ची सॅलरी जाणून तुम्ही थक्क व्हाल!

ज्या कंपनीत केली पहिली नोकरी, आता तिचेच बनले बॉस; TCS च्या नव्या CEO ची सॅलरी जाणून तुम्ही थक्क व्हाल!

के किर्तीवासन हे सर्वाधिक सॅलरी मिळवणाऱ्या सीईओंमध्ये सामील आहेत...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 05:43 PM2023-04-13T17:43:14+5:302023-04-13T17:44:20+5:30

के किर्तीवासन हे सर्वाधिक सॅलरी मिळवणाऱ्या सीईओंमध्ये सामील आहेत...

who is tata group tcs new ceo k krithivasan know about his salary | ज्या कंपनीत केली पहिली नोकरी, आता तिचेच बनले बॉस; TCS च्या नव्या CEO ची सॅलरी जाणून तुम्ही थक्क व्हाल!

ज्या कंपनीत केली पहिली नोकरी, आता तिचेच बनले बॉस; TCS च्या नव्या CEO ची सॅलरी जाणून तुम्ही थक्क व्हाल!

टाटा समूहाची (TATA Group) आयटी कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टेन्सी सर्व्हिसेसने (TCS) आर्थिक वर्ष 2022-23 साठी चौथ्या तिमाहीचा रिझल्ट जारी केला आहे. यावेळी याकंपनीला छप्परफाड नफा झाला आहे. यावेळचा कंपनीचा नफा तब्बल 11,392 कोटी रुपये एवढा आहे. देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात व्हॅल्युएबल कंपनी असलेल्या टीसीएसमध्ये 6 लाखहून अधिक कर्मचारी काम करतात. महत्वाचे म्हणजे, एकीकडे जगभरातील मोठ मोठ्या कंपन्या कर्मचारी कपात करत असताना, दुसरीकडे TCS ने वर्षभरात 22600 जणांना नोकरी दिली आहे. 

टाटा या नावाचा विश्वास TCS सोबतही जोडला गेला आहे. टीसीएसमध्ये आता मोठ्या प्रमाणावर फेरबदल होणार आहेत. कंपनीचे सीईओ आणि एमडी राजेश गोपीनाथन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांची जागेवर के किर्तीवासन (K Krithivasan) यांची सीईओ आणि मॅनेजिंग डायरेक्टर पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. 1 जून 2023 ला के कीर्तिवासन TCS च्या सीईओ पदाती धुरा आपल्या हाती घेतील. महत्वाची आणि मोठी गोष्ट म्हणजे, किर्तिवासन यांनी आपल्या करिअरची सुरुवात ज्या कंपनीपासून केली, ते आता त्याच कंपनीची धुरा सांभाळणार आहेत.

जेथून करिअरची सुरुवात केली आता त्याच कंपनीत बॉस - 
के किर्तिवासन आता TCS चे नवे बॉस होणार आहेत. ते 1 जून 2023 पासून कंपनीची धुरा आपल्या हाती घेतील. त्यांनी 34 वर्षांपूर्वी आपल्या करिअरची सुरुवात टीसीएस पासूनच केली होती. वर्ष 1989 मध्ये ते कंपनीसोबत जोडले गेले होते. त्यांनी मद्रास युनिव्हर्सिटीतून मॅकेनिकल इंजिनिअरिंगमध्ये ग्रॅज्युएशन केले आणि आयआयटी कानपूरहून इंजिनिअरिंगमध्ये मास्टर डिग्री मिळवल्यानंतर, त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात टाटासोबत केली. त्यांनी डिलिव्हरी, सेल्स, फायनांशिअल सर्व्हिसेसमध्ये मोठी भूमिका पार पाडली. त्यांनी कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट, प्रोग्रॅम मॅनेजमेंट आणि सेल्सचे काम सांभाळले. आता ते याच कंपनीची धुरा सांभाळतील.

किती असेल सॅलरी? -
आपल्या करिअरच्या सुरुवातीपासूनच के किर्तिवासन हे टीसीएस सोबत आहेत. TCS च्या उत्पन्नात त्यांचे योगदान 35-40% एवढे आहे. हे योगदान बीएफएसआय सेगमेन्टमधून येते. त्यांच्या सॅलरीसंदर्भात बोलायचे झाल्यास, ते सर्वाधिक सॅलरी मिळवणाऱ्या सीईओंमध्ये सामील आहेत.

माध्यमांतील वृत्तांनुसार, 2018-19 मध्ये त्यांचे सॅलरी पॅकेज 4.3 कोटी रुपये एवढे होते. मनी कंट्रोलच्या वृत्तानुसार, टीसीएसचे आताचे सीईओ राजेश गोपीनाथन यांची सॅलरी 2021-22 मध्ये 25.75 कोटी रुपये एवढी होती. अर्थात किर्तिवासन यांची आताची सॅलरीही याच्याच जवळपास असेल.

Web Title: who is tata group tcs new ceo k krithivasan know about his salary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.