नवी दिल्ली : सध्या इंटरनेट स्पीडला प्रचंड महत्त्व आले आहे. ज्याचा स्पीड चांगला, नेटवर्क चांगले त्या कंपनीकडे ग्राहक वळतात, असा ट्रेंड आहे. देशभरात ब्रॉडबँड इंटरनेट स्पीडमध्ये दादा कोण याचा अहवाल समोर आला आहे. जाणून घेऊ कोणती कंपनी आहे पुढे..?
कोणत्या नेटवर्कवर व्हिडीओ थांबत नाही?ब्रॉडबँड नेटवर्कवर व्हिडीओसाठी चांगल्या असलेल्या टॉप तीन मध्ये एअरटेल पहिल्या तर जिओ दुसऱ्या स्थानी आहे. बीएसएनएल तिसऱ्या स्थानावर आहे.
नेटवर्कचे सातत्य कोणाचे चांगले?यात जिओने बाजी मारली असून एअरटेलपेक्षाही नेटवर्कचे सातत्य जिओचे चांगले आढळून आले आहे. यात सरकारी कंपनी बीएसएनएल मागे आहे.
बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, अहमदाबाद आणि कोलकाता या महत्त्वाच्या शहरांमध्ये उत्तम इंटरनेट देण्यात तेथील स्थानिक ब्रॉडबँड कंपन्या पुढे असल्याचे आढळले आहे.
मुंबईत कोण पुढे?
nब्रॉडबँड डाऊनलोड स्पीडमध्ये एअरटेलचा स्पीड जिओपेक्षा २४.६ टक्के जास्त आहे. nतर अपलोड स्पीड १५.८ टक्के अधिक आहे.