Join us

जगातील सर्वात मोठ्या सुरत डायमंड बोर्सचे मालक कोण आहेत? जाणून घ्या, सविस्तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2023 5:20 PM

सुरत डायमंड बोर्स इमारत, जगातील सर्वात मोठे ऑफिस कॉम्प्लेक्स, 67 लाख स्क्वेअर फूट पेक्षा जास्त क्षेत्रात पसरलेले आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आंतरराष्ट्रीय हिरे आणि दागिन्यांच्या व्यापारासाठी जगातील सर्वात मोठे आणि आधुनिक केंद्र असलेल्या सुरत डायमंड बोर्सचे (SDB)उद्घाटन केले. सुरत डायमंड बोर्स इमारत, जगातील सर्वात मोठे ऑफिस कॉम्प्लेक्स, 67 लाख स्क्वेअर फूट पेक्षा जास्त क्षेत्रात पसरलेले आहे. हे सुरत शहराजवळील खजोद गावात आहे.अधिकृत निवेदनानुसार, हे खडबडीत आणि पॉलिश हिरे तसेच दागिन्यांच्या व्यापारासाठी जागतिक केंद्र असणार आहे. 

निवेदनात असे म्हटले आहे की, सुरत डायमंड बोर्स आयात आणि निर्यातीचे केंद्र बनेल, म्हणजे भारतातून बारसाठी खरेदी आणि विक्री होईल. तसेच, या कॉम्प्लेक्समध्ये ज्वेलरी मॉल आणि रिटेल ज्वेलरी व्यवसायासाठी आंतरराष्ट्रीय बँकिंग सुविधा असतील. सुरत डायमंड बोर्सचे माध्यम संयोजक दिनेश नावडिया यांनी अलीकडेच एका निवेदनात म्हटले होते की, मुंबईतील हिरे व्यापाऱ्यांसह अनेक हिरे व्यापाऱ्यांनी लिलावानंतर व्यवस्थापनाने वाटप केलेली कार्यालये आधीच ताब्यात घेतली आहेत.

कोण आहेत मालक?सुरत डायमंड बोर्सचे (SDB) एक नॉन प्रॉफिट एक्सचेंज आहे. कंपनी कायदा 2013 च्या कलम 8 अंतर्गत नोंदणीकृत आहे. सुरत डायमंड बोर्स हा डायमंड रिसर्च आणि मर्कंटाइल (ड्रीम) सिटीचा भाग आहे. या उपक्रमाचे श्रेय एसआरके डायमंड्सचे मालक गोविंद ढोलकिया, आरके डायमंड्सचे संस्थापक आणि पद्मश्री पुरस्कार विजेते सावजीभाई ढोलकिया आणि धर्मानंदन डायमंड्सचे मालक लालजी भाई पटेल यांना जाते. हे तिघेही हिरे व्यापारी होते, ज्यांनी 2013-14 मध्ये सुरतला डायमंड हब बनवण्याचे स्वप्न पाहिले होते. ही कल्पना घेऊन हे तिघे तत्कालीन मुख्यमंत्री आनंदीबेन यांच्याकडे गेले. त्यानंतर त्यांनी यासाठी काम करण्यास होकार दिला. त्यानंतर यासाठी एक बोर्ड तयार करण्यात आले, ज्यामध्ये महेश गढवी यांना सीईओ करण्यात आले.

2015 मध्ये प्रकल्पाची पायाभरणीदरम्यान, ही इमारत सुरत आणि गुजरातमध्ये डायमंड बोर्सची स्थापना आणि प्रचारासाठी बांधण्यात आली आहे. महेश गढवी यांनी सांगितले की, पेंटागॉनला मागे टाकणे हा त्यांच्या उद्देशाचा भाग नव्हता. तर प्रकल्पाचा आकार मागणीनुसार निर्धारित केला जातो. तसेच, इमारत बांधण्यापूर्वी अनेकांनी येथे कार्यालये खरेदी केली होती, असे महेश गढवी यांनी सांगितले. दरम्यान, गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी फेब्रुवारी 2015 मध्ये सुरत डायमंड बोर्स आणि ड्रीम सिटी प्रकल्पाची पायाभरणी केली होती.

किती रुपये आहे भाडे?अंदाजे 4,500 डायमंड ट्रेडिंग कार्यालयांसह सुरत डायमंड बोर्स आता जगातील सर्वात मोठे आहे. ही विशाल इमारत ड्रीम सिटीमध्ये 35.54 एकर जागेवर बांधली गेली आहे, ज्यामध्ये 300 चौरस फूट ते एक लाख चौरस फूट कार्यालयांसह 15 मजल्यांचे नऊ टॉवर आहेत. या डायमंड हबच्या उभारणीच्या सुरुवातीला येथील भाडे 3500 रुपये प्रति चौरस फूट होते, ते आता 8500 रुपये प्रति चौरस फूट झाले आहे.

टॅग्स :व्यवसायगुजरातनरेंद्र मोदी