Lokmat Money > बिझनेस न्यूज > सर्वांत श्रीमंत काेण..?; जगातील १% लोकांकडे ९९ टक्के लोकांच्या दुप्पट संपत्ती

सर्वांत श्रीमंत काेण..?; जगातील १% लोकांकडे ९९ टक्के लोकांच्या दुप्पट संपत्ती

२०२० नंतर निर्माण झालेल्या एकूण संपत्तीपैकी २ तृतीयांश संपत्ती १% लोकांकडे आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 05:51 AM2023-07-13T05:51:12+5:302023-07-13T05:51:47+5:30

२०२० नंतर निर्माण झालेल्या एकूण संपत्तीपैकी २ तृतीयांश संपत्ती १% लोकांकडे आहे.

Who is the richest..?; 1% of the world has twice as much wealth as the 99% | सर्वांत श्रीमंत काेण..?; जगातील १% लोकांकडे ९९ टक्के लोकांच्या दुप्पट संपत्ती

सर्वांत श्रीमंत काेण..?; जगातील १% लोकांकडे ९९ टक्के लोकांच्या दुप्पट संपत्ती

संपत्तीचे न्याय्य वाटप केले पाहिजे, असे कार्ल मार्क्स यांनी म्हटले हाेते, तरी संपत्तीसाठी आजही घर, राज्य, देशांमध्ये स्पर्धा लागली आहे. ज्याच्याकडे अधिक पैसा, तो अधिक श्रीमंत या तत्त्वानुसार अमेरिकेत जगातील सर्वाधिक संपत्ती एकवटली आहे. जगाच्या पाठीवर असलेल्या एकूण संपत्तीचे विविध देशांमध्ये कसे वितरण झाले आहे, यावर एक नजर...

जगातील १% लोकांकडे उर्वरित ९९% लोकांकडे असलेल्या संपत्तीच्या दुप्पट संपत्ती एकवटली आहे. २०२० नंतर निर्माण झालेल्या एकूण संपत्तीपैकी २ तृतीयांश संपत्ती १% लोकांकडे आहे.

भारतातील विषमता

१०% भारतीयांकडे ७२% संपत्ती
५% भारतीयांकडे ६२%संपत्ती 
१% लोकांकडे तळातील ५०% 
लोकांकडील एकूण संपत्तीच्या १३ पट संपत्ती

भारतामध्येही मोठ्या प्रमाणात संपत्तीचे असमान वितरण आहे. गेल्या काही वर्षांपासून श्रीमंत अधिक श्रीमंत तर गरीब अधिक गरीब होत चालले असल्याचे समोर आले आहे.

सर्वाधिक संपत्तीचे देश (ट्रिलियन डॉलरमध्ये)

जपान     २६ 
जर्मनी     १७ 
फ्रान्स     १६ 
इंग्लंड     १६ 
भारत     १४ 
कॅनडा      १२ 
इटली     १२ 
ऑस्ट्रेलिया ११ 

संपत्तीचे असमान वितरण (संपत्ती ट्रिलियनमध्ये)
    लोकसंख्या     प्रमाण    संपत्ती    प्रमाण
    ६.२५ कोटी     १.२%    $२२१.७    ४७.८% 
    ६२.७ कोटी     ११.८%     $१७६.७    ३८.१% 
    १५७.४ कोटी     ३३.८%     $६०.४    १३% 
    २८० कोटी     ५३.२%     $५    १.१%

 

Web Title: Who is the richest..?; 1% of the world has twice as much wealth as the 99%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.