Mukesh Ambani Jio World Plaza : मुकेश अंबानी यांच्या जिओ वर्ल्ड प्लाझामध्ये बर्नार्ड अर्नॉल्ट यांची कंपनी LMHचे लुई व्हिटन स्टोअर भाड्यानं घेतलं आहे. अंबानींपेक्षा श्रीमंत असलेले अर्नाल्ट या स्टोअरसाठी महिन्याला ४०.५ लाख रुपये भाडं देतात. एलव्हीएमएच ही जगातील सर्वात मोठ्या लक्झरी कंपन्यांपैकी एक आहे. जिओ वर्ल्ड प्लाझा मुंबईच्या केबीसीमधील अग्रगण्य लक्झरी शॉपिंग डेस्टिनेशन बनत आहे. बॅलेन्सियागा सारखे इतर मोठे ब्रँडही तेथे येत आहेत. तेदेखील जवळपास तेवढंच भाडं देत आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
https://www.whatsapp.com/channel/0029VaBACbfInlqHyOB7FE09
बर्नार्ड अर्नाल्ट किती श्रीमंत?
रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. पण, आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले बर्नार्ड अर्नाल्ट त्यांच्या कमाईत हातभार लावत आहेत. लक्झरी रिटेल भाड्याच्या माध्यमातून हे योगदान दिलं जात आहे. फोर्ब्सनुसार, अर्नाल्ट यांची एकूण संपत्ती १६८.८ अब्ज डॉलर्स आहे, तर अंबानींची एकूण संपत्ती ९४.९ अब्ज डॉलर्स आहे. अर्नाल्ट हे एलव्हीएमएचचे सीईओ आणि चेअरमन आहेत. एव्हीएमएच हा लक्झरी प्रोडक्ट्सचा ब्रँड आहे. त्यांच्याकडे लुई व्हिटन, टिफनी अँड कंपनी, डायर, गिवेन्ची, टॅग ह्युअर आणि बल्गेरी यांसारखे प्रसिद्ध ब्रँड आहेत.
बर्नार्ड अर्नॉल्ट हे थेट मुकेश अंबानी यांचे भाडेकरू नाहीत. अंबानींच्या मॉल जिओ वर्ल्ड प्लाझामध्ये त्यांची कंपनी एलव्हीएमएचनं जागा भाड्यानं घेतली आहे. हा मॉल मुंबईतील केबीसीमध्ये आहे. हे लक्झरी ब्रँडचं केंद्र बनत चाललं आहे. जगातील सर्वात महागड्या ब्रँडची शोरूम्स या ठिकाणी आहेत. यापैकी एक म्हणजे लुई व्हिटनचं शोरूम, जे अर्नाल्ट यांची कंपनी एलव्हीएमएचचा फ्लॅगशिप ब्रँड आहे.
किती आहे जागा?
लुई व्हिटन स्टोअर्सनं जिओ वर्ल्ड प्लाझामध्ये ७,४६५ चौरस फूट जागा भाड्यानं दिली आहे. ईटी नाऊच्या वृत्तानुसार, लुई व्हिटन दरमहा ४०.५ लाख रुपये (४८,६०० डॉलर) भाडं देतं. हे भाडं मुकेश अंबानी यांच्या कंपनीला जातं. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक व्यक्ती अप्रत्यक्षरित्या दुसऱ्या श्रीमंत व्यक्तीच्या कमाईत कसा हातभार लावत आहे, हे यातून दिसून येतं.