Lokmat Money > बिझनेस न्यूज > ॲडव्हान्स टॅक्स कोणी भरावा? जाणून घ्या सहज सोप्या संवादातून...

ॲडव्हान्स टॅक्स कोणी भरावा? जाणून घ्या सहज सोप्या संवादातून...

कृष्णा, आर्थिक वर्ष २०२२ - २३साठी आयकर ॲडव्हान्स टॅक्स (आगाऊ कर) भरण्यासाठी अंतिम तारखा कोणकोणत्या आहेत आणि ॲडव्हान्स टॅक्स कोणी भरावा? 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 08:27 AM2022-06-13T08:27:53+5:302022-06-13T08:29:04+5:30

कृष्णा, आर्थिक वर्ष २०२२ - २३साठी आयकर ॲडव्हान्स टॅक्स (आगाऊ कर) भरण्यासाठी अंतिम तारखा कोणकोणत्या आहेत आणि ॲडव्हान्स टॅक्स कोणी भरावा? 

Who pays advance tax Learn from simple conversations | ॲडव्हान्स टॅक्स कोणी भरावा? जाणून घ्या सहज सोप्या संवादातून...

ॲडव्हान्स टॅक्स कोणी भरावा? जाणून घ्या सहज सोप्या संवादातून...

अर्जुन : कृष्णा, आर्थिक वर्ष २०२२ - २३साठी आयकर ॲडव्हान्स टॅक्स (आगाऊ कर) भरण्यासाठी अंतिम तारखा कोणकोणत्या आहेत आणि ॲडव्हान्स टॅक्स कोणी भरावा? 

कृष्णा : अर्जुन, करदात्याची आयकराची देय रक्कम एका आर्थिक वर्षात दहा हजार रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्याला १५ जूनपर्यंत १५ टक्के, १५ सप्टेंबरपर्यंत ४५ टक्के, १५ डिसेंबरपर्यंत ७५ टक्के आणि १५ मार्चपर्यंत शंभर टक्के असा चार हप्त्यामध्ये ॲडव्हान्स टॅक्स भरावा लागतो. ज्या करदात्यांनी त्यांचे व्यवसायी उत्पन्न मोजण्यासाठी सेक्शन ४४ एडी आणि ४४ एडीए निवडले आहे, त्यांनी फक्त आगाऊ कर हा शेवटच्या हप्त्यात भरावा. वरिष्ठ नागरिक ज्यांचे वय ६० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त आहे आणि त्यांना व्यवसायातून कोणत्याही प्रकारचे उत्पन्न नाही, त्यांना आगाऊ कर भरण्यापासून सवलत आहे. 

अर्जुन : कृष्णा, नवीन पोर्टलवर आगाऊ कर भरण्यासाठी काही माहिती उपलब्ध आहे का? 

कृष्णा : अर्जुन, आयकराच्या बाबतीत आगामी किंवा चालू वर्षाचे निर्णय मागील वर्षाच्या नफा आणि तोट्याच्या आधारावर घेतले जातात. नवीन पोर्टलवर मागील दोन आर्थिक वर्षांसाठी करपात्र उत्पन्न आणि कर दायित्त्वाचे तपशील उपलब्ध आहेत. पुढे, आगाऊ कर, टीडीएस / टीसीएस आणि मागील दोन आर्थिक वर्षासाठी भरलेल्या स्व-मूल्यांकन कराचे तपशील देखील उपलब्ध आहेत. 

अर्जुन : कृष्णा, जर आगाऊ कर भरला नाही तर काय होईल? 

कृष्णा : अर्जुन, आगाऊ कर नाही भरला तर १ टक्के दरमहा व्याज भरावे लागेल. कदाचित आयकर विभागाची चौकशीदेखील येऊ शकते. जो करदाता जास्त मोठ्या रकमेचा आगाऊ कर भरण्यासाठी जबाबदार आहेत, त्याला दंडसुद्धा होऊ शकतो. संगणकीकरणामुळेसुध्दा आयकर विभागाला बरीच माहिती प्राप्त होत आहे. ज्याच्या आधारावर आयकर विभाग आगाऊ कराच्या मागणीसाठी विचारू शकते. करदाता आगाऊ कर १५ मार्चनंतरही भरू शकतो. पण ३१ मार्चपर्यतच आणि सेक्शन २३४-बी च्या अंतर्गत लागणारे व्याज वाचवू शकतो.

Web Title: Who pays advance tax Learn from simple conversations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.