Lokmat Money > बिझनेस न्यूज > Raghuram Rajan यांना राजकारणात येण्यापासून कोणी रोखलं? खुद्द माजी RBI गव्हर्नरांनी केला खुलासा

Raghuram Rajan यांना राजकारणात येण्यापासून कोणी रोखलं? खुद्द माजी RBI गव्हर्नरांनी केला खुलासा

Raghuram Rajan Politics : रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आणि अर्थतज्ज्ञ म्हणून रघुराम राजन हे सर्वांच्याच परिचयाचे आहे. एका मुलाखतीदरम्यान आपण राजकारणापासून का दूर आहोत, याबाबत त्यांनी खुलासा केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 09:36 AM2024-05-29T09:36:21+5:302024-05-29T09:37:55+5:30

Raghuram Rajan Politics : रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आणि अर्थतज्ज्ञ म्हणून रघुराम राजन हे सर्वांच्याच परिचयाचे आहे. एका मुलाखतीदरम्यान आपण राजकारणापासून का दूर आहोत, याबाबत त्यांनी खुलासा केला.

Who stopped Raghuram Rajan from entering politics The former RBI Governor himself disclosed | Raghuram Rajan यांना राजकारणात येण्यापासून कोणी रोखलं? खुद्द माजी RBI गव्हर्नरांनी केला खुलासा

Raghuram Rajan यांना राजकारणात येण्यापासून कोणी रोखलं? खुद्द माजी RBI गव्हर्नरांनी केला खुलासा

Raghuram Rajan Politics : रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आणि अर्थतज्ज्ञ म्हणून रघुराम राजन हे सर्वांच्याच परिचयाचे आहे. एका मुलाखतीदरम्यान आपण राजकारणापासून का दूर आहोत, याबाबत त्यांनी खुलासा केला. आपल्या कुटुंबासाठी आपण राजकारणापासून दूर असल्याचे ते म्हणाले. तसंच त्यांच्या पत्नी आणि कुटुंबीयांची राजन राजकारणात जावं अशी इच्छा नसल्याचे ते म्हणाले. याशिवाय त्यांनी मुलाखतीदरम्यान राहुल गांधींचंही कौतुक करत ते हुशार आणि समजुतदार व्यक्ती असल्याचं म्हटलं. विचार करण्याची आणि नेतृत्व करण्याची क्षमता नसलेली व्यक्ती म्हणून त्याचे वर्णन अनेकदा केले जाते. हे पूर्णपणे चुकीचं असल्याचं त्यांनी नमूद केलं.
 

'राजकारण माझं काम नाही...'
 

नुकतीच रघुराम राजन यांनी द प्रिन्टला एक मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. "कुटुंबाच्या इच्छेचा आदर करून राजकारणात येऊ इच्छित नाही. त्याऐवजी शक्य तिथे मदत करायला मी तयार आहे. माझं काम राजकारण नाही, हे मी अनेकदा स्पष्ट केलं आहे. मी अर्थतज्ज्ञ आहे. हे काम मी चांगल्या प्रकारे करू शकतो. मी राजकारणात यावं, अशी माझ्या घरच्यांचीही इच्छा नव्हती," असं राजन म्हणाले. सरकारची धोरणं कोलमडत आहेत असं मला कुठेही वाटत असेल तर मी त्याबद्दल बोलतो. मी सरकारचा भाग आहे की नाही हे महत्त्वाचं नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
 

'राहुल गांधी समजूतदार नेते'
 

मुलाखतीदरम्यान, त्यांना राहुल गांधी यांना तुम्ही काय सल्ला देता असा प्रश्न विचारण्यात आला. "राहुल गांधी समजूतदार आणि धाडसी नेते आहेत. त्यांच्या वडिलांची आणि आजीची हत्या करण्यात आली होती. अशा परिस्थितीत दुसरी कोणी व्यक्ती लपून राहिली असती. त्यांच्यात विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता आहे. त्यांच्यात नेतृत्व करण्याचीही क्षमता आहे. कोरोनादरम्यानही आपल्याला चांगल्या प्रकारे तयारी करावी लागेल असं ते म्हणत होते. दुसऱ्या लाटेदरम्यानही त्यांनी आपल्या रॅली रद्द केल्या होत्या," असं ते म्हणाले.
 

रघुराम राजन यांच्याकडे नरेंद्र मोदी सरकारचे टीकाकार म्हणूनही पाहिलं जातं. सरकारच्या पीएलए योजना आणि चिप उद्योगातील प्रचंड गुंतवणुकीवर त्यांनी अनेकदा टीका केली आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेतही ते सहभागी झाले होते. तेव्हापासून ते काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा सुरू होती. त्यामुळे रघुराम राजन यांना पुढचे मनमोहन सिंग व्हायचं आहे, असं भाजपनं म्हटलं होतं.

Web Title: Who stopped Raghuram Rajan from entering politics The former RBI Governor himself disclosed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.