Join us  

कोणाला मिळणार रतन टाटांची ₹7900 कोटींची संपत्ती? 'या' चौघांना मिळाली मोठी जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 7:24 PM

Ratan Tata property: रतन टाटा यांनी आपल्या मृत्यूपूर्वी वारसापत्र तयार करुन ठेवले आहे.

Ratan Tata property: ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांची संपत्ती कोणाला मिळणार? हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. रतन टाटा यांनी लग्न केले नसल्यामुळे त्यांचा उत्तराधिकारी कोण असेल? असा प्रश्नही अनेकांना पडला आहे. सावत्र भाऊ नोएल टाटा यांच्याकडे टाटा ट्रस्टची जबाबदारी सोपवण्यात आली आहे, मात्र रतन टाटा यांची वैयक्तिक 7900 कोटी रुपयांची मालमत्ता कोणाला मिळणार, हे लवकरच कळणार आहे.

रतन टाटा यांच्याकडे किती मालमत्ता आहे?हुरुन इंडिया रिच लिस्ट 2024 नुसार, रतन टाटा यांच्याकडे 7900 कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यांची टाटा सन्समध्ये 0.83% हिस्सेदारी होती. धर्मादाय आणि परोपकारात नेहमीच आघाडीवर असणा-या रतन टाटा यांना आपल्या संपत्तीचा मोठा हिस्सा धर्मादाय आणि समाजकल्याणासाठी द्यायचा होता. त्यांच्या उत्पन्नाचा किंवा संपत्तीचा तीन चतुर्थांश हिस्सा टाटा सन्सशी जोडलेला आहे. त्यांनी दोन डझनहून अधिक कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. 

Ola, Paytm, Traxon, FirstCry, Bluestone, CarDekho, CashKaro, Urban Company आणि Upstox सारख्या डझनभर कंपन्यांमध्ये त्यांची गुंतवणूक आहे. याशिवाय रतन टाटा यांनी RNT असोसिएट्स प्रायव्हेट लिमिटेडद्वारे 2023 पर्यंत 186 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. या गुंतवणुकीव्यतिरिक्त त्यांचे मुंबईतील कुलाबा येथे घर आहे. यासोबतच अलिबागमध्ये अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर हॉलिडे होम आहे.

रतन टाटांची इच्छारतन टाटा यांनी मृत्यूपूर्वी आपले मृत्यूपत्र तयार करुन ठेवले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रतन टाटा यांनी आपली इच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी 4 जणांवर सोपवली आहे. यामध्ये त्यांचे मित्र आणि वकील दारियस खंबाटा, सहकारी मेहली मिस्त्री, सावत्र बहिणी शिरीन आणि डायना जीजीभॉय यांचा समावेश आहे. रतन टाटांची इच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी या चार लोकांवर आहे. 

रतन टाटा यांच्या मृत्यूपत्राचा तपशील पूर्णपणे खाजगी आहे. मेहली मिस्त्री यांच्यावर त्यांनी विश्वास व्यक्त केला. मेहली सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्टच्या बोर्डवर विश्वस्त होते. मेहिल मिस्त्री हे टाटा सन्सचे माजी अध्यक्ष दिवंगत सायरस मिस्त्री यांचे चुलत भाऊ आहेत. गेली अनेक वर्षे ते रतन टाटा यांची काळजी घेत होते. 2022 मध्ये टाटांच्या दोन सर्वात मोठ्या ट्रस्टच्या मंडळांमध्ये त्यांचा समावेश करण्यात आला.

टॅग्स :रतन टाटाव्यवसायगुंतवणूक