Lokmat Money > बिझनेस न्यूज > 'हे' गाव रातोरात झालं श्रीमंत! दीडशेहून अधिकजण झाले करोडपती!

'हे' गाव रातोरात झालं श्रीमंत! दीडशेहून अधिकजण झाले करोडपती!

एका गावातील १६५ जणांचे नशीब रोतरात पलटले आहे. एका रात्रित या गावातील नागरिक करोडपती झाले आहेत. हे वाचून तुम्हाला पटणार नाही,  पण ही बातमी खरी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2022 11:45 AM2022-12-09T11:45:34+5:302022-12-09T11:45:43+5:30

एका गावातील १६५ जणांचे नशीब रोतरात पलटले आहे. एका रात्रित या गावातील नागरिक करोडपती झाले आहेत. हे वाचून तुम्हाला पटणार नाही,  पण ही बातमी खरी आहे.

whole village became millionaires overnight luckiest 165 people got 7 crores rs | 'हे' गाव रातोरात झालं श्रीमंत! दीडशेहून अधिकजण झाले करोडपती!

'हे' गाव रातोरात झालं श्रीमंत! दीडशेहून अधिकजण झाले करोडपती!

एका गावातील १६५ जणांचे नशीब रोतरात पलटले आहे. एका रात्रित या गावातील नागरिक करोडपती झाले आहेत. हे वाचून तुम्हाला पटणार नाही,  पण ही बातमी खरी आहे. या गावातील नागरिकांनी एकत्रित लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते. यातील १६५ जणांनी लॉटरी जिंकली. यात गावातील नागरिकांना १२०० कोटी रुपयांचे बक्षिस मिळाले आहे, त्यामुळे आता आख्ख गावच करोडपती झाले आहे. 

ही घटना ओल्मेन गावातील आहे. १६५ जणांनी एकत्रित येऊन युरोमिलियन लॉटरीची तिकिटे खरेदी केली. त्यासाठी प्रत्येकाने १,३०८ रुपये दिले होते. मंगळवारी लकी ड्रॉ जाहीर करण्यात आला, यामध्ये त्यांनी लॉटरी जिंकली आहे. आता या नागरिकांना १२३ दशलक्ष पौंड बक्षीस म्हणून मिळणार आहेत. भारतीय चलनानुसार ही रक्कम १२०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

फक्त 23 रुपयांच्या या शेअरनं केली कमाल; गुंतवणूकदार झाले मालामाल, 7 दिवसांत पैसा डबल!

ही रक्कम १६५ लोकांमध्ये वाटली तर प्रत्येकाच्या खात्यात सुमारे साडेसात कोटी रुपये जाणार आहेत. लॉटरी काढण्यापूर्वीच बक्षिसाची रक्कम सर्वांमध्ये समान वाटली जाईल, असे गावकऱ्यांनी ठरवले होते.

'ग्रुपमध्ये अशा प्रकारे बक्षीस जिंकणे ही नवीन गोष्ट नाही. १६५ लोकांचा हा ग्रुप आतापर्यंतचा सर्वात मोठा लॉटरी विजेता आहे. त्यांनी ५ ते ६ वेळा लॉटरी जिंकण्याचा मुद्दा पुन्हा सांगावा लागला कारण लोकांचा विश्वास बसत नव्हता की त्यांनी एवढी मोठी रक्कम जिंकली आहे. सध्या तरी विजेत्यांची ओळख उघड झालेली नाही. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा युरोमिलियन्स जॅकपॉट नाही. ब्रिटनमधील एका व्यक्तीने या वर्षी जुलैमध्ये १९५ मिलियन पौंड (१९००० कोटी) बक्षीस जिंकले होते.

Web Title: whole village became millionaires overnight luckiest 165 people got 7 crores rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.