नवी दिल्ली - ऑक्टोबर महिन्याचा घाऊक महागाईचा दर जाहीर झाला आहे. दर महा आधारावर जाहीर होणार घाऊक महागाईचा दर सप्टेंबरमधील १.३२ टक्क्यांच्या तुलनेत ०.१६ टक्कांनी वाढून १.४८ टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षभरात सलग तिसऱ्यांदा या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे हा दर गेल्या आठ महिन्यातील सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे.
अन्नपदार्थांसाठीचा डब्ल्यूपीआय घटून ५.७८ टक्क्यांवर पोहोचला आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये हा दर ६.९२ टक्के होता. ऑक्टोबर महिन्यात मॅन्युफॅक्चरिंग उत्पादनांचे मूल्यामध्ये मोठ्या प्रमाणात तेजी दिसून आली. सप्टेंबरमध्ये १.६१ टक्क्यांच्या तुलनेत वाढून २.१२ टक्क्यांवर पोहोचला आहे.
The rate of inflation, based on the monthly Wholesale Price Index (WPI), stood at 1.48% (provisional) for the month of October 2020 (over October 2019), as compared to 0.00 % during the corresponding month of the previous year: Govt of India
— ANI (@ANI) November 16, 2020
अन्नपदार्थांच्या घाऊक बाजारातील महागाईच्या दरामध्ये घट झाल्यानंतरही घाऊक आणि किरकोळ मूल्याच्या दृष्टीने चिंता कायम आहे. तज्ज्ञांच्या मते अन्नपदार्थांचा महागाई दर आता भाजीपाला आणि फळांशिवाय अन्य वस्तूंवर पडू लागला आहे. अशा परिस्थितीत पुढच्या दिवसांमध्ये याचा प्रभाव व्याज दरांवर पडू शकतो.