Join us

खिशाला आणखी कात्री! घाऊक महागाईचा दर ११ महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 1:52 PM

इंधन दरवाढीचे परिणाम दिसू लागले आहेत. जानेवारी महिन्यात घाऊक मूल्यावर आधारित महागाई दरात वाढ झाली आहे. घाऊक महागाई दर २.०३ टक्के झाला असून, महागाईच्या दराने गेल्या ११ महिन्यांतील उच्चांकी पातळीवर गाठली असल्याचे सांगितले जात आहे. ((wholesale inflation rate has risen)

ठळक मुद्देइंधन, वीज दरवाढीचा परिणामतिमाहीतील क्रम चढाच राहण्याचा अंदाजघाऊक महागाई दराने गाठली ११ महिन्यातील उच्चांकी पातळी

नवी दिल्ली : सलग आठ दिवस झालेली इंधन दरवाढ आणि गॅसच्या किमतीत झालेली वाढ पाहता सर्वसामान्यांचे गणित कोलमडले आहे. त्यातच आता घाऊक महागाईचा दर ११ महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर गेल्यामुळे सर्व सामान्य माणसांच्या खिशाला आणखी कात्री लागणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. (wholesale inflation rate has risen to 11 month high in january)

इंधन दरवाढीचे परिणाम दिसू लागले आहेत. जानेवारी महिन्यात घाऊक मूल्यावर आधारित महागाई दरात (wholesale inflation rate) वाढ झाली आहे. घाऊक महागाई दर २.०३ टक्के झाला असून, महागाईच्या दराने गेल्या ११ महिन्यांतील उच्चांकी पातळीवर गाठली असल्याचे सांगितले जात आहे. महागाई वाढण्यास इंधन दरवाढ कारणीभूत ठरली असून, नजीकच्या काळात महागाई आणखी वाढेल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. 

डिसेंबर महिन्यात दर कमी

कारखाना उत्पादित वस्तूंच्या किमतीत वाढ झाल्याने जानेवारी महिन्यात घाऊक महागाई दरात वाढ झाली आहे. जानेवारी महिन्यात घाऊक महागाई दर २.०३ टक्के झाला आहे. डिसेंबर घाऊक महागाई दर १.२२ टक्के होता. तर जानेवारी २०२० मध्ये घाऊक महागाई दर ३.५२ टक्के होता. केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने यासंदर्भातील आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

गुड न्यूज! स्टेट बँकेच्या ग्राहकांना आता 'या' सेवा मिळणार घरपोच; वाचा डिटेल्स

इंधन, वीज दरवाढीचा परिणाम

उत्पादित वस्तूंसह, इंधन आणि विजेच्या दरातील वाढ, खनिज तेल व नैसर्गिक वायूच्या किमती वाढल्याने जानेवारी महिन्यात घाऊक किमतींवर आधारित असलेल्या चलनवाढीच्या दरात तीव्र स्वरूपाची वाढ दिसून आली, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाकडून देण्यात आली. 

तिमाहीतील क्रम चढाच राहील

खाद्यान्न आणि इंधन तसेच ऊर्जा या किमती अस्थिर व निरंतर बदलत असलेल्या घटकांना वगळल्यानंतर मोजल्या जाणाऱ्या ग्राहक किमतीवर आधारित महागाईचा दर जानेवारी महिन्यात २७ महिन्यांचा उच्चांक गाठणारा नोंदविला गेला आहे. वाढती मागणीमुळे किमती आणखी वाढण्याची शक्यता असून, एप्रिल ते जून या आगामी तिमाहीत हा क्रम चढाच राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

'हे' काम न केल्यास ३१ मार्चनंतर Deactivate होईल पॅनकार्ड; जाणून घ्या महत्त्वाचे डिटेल्स

पेट्रोल-डिझेलची सलग दरवाढ

पेट्रोलियम कंपन्यांनी सलग आठव्या दिवशी इंधन दरात वाढ केली आहे. मंगळवारी देशभरात पेट्रोल ३० पैसे तर डिझेल ३५ पैशानी महागले आहे. या दरवाढीने आज मुंबईत पेट्रोलचा भाव ९५.७५ रुपये झाला आहे. अनेक शहरांत पॉवर पेट्रोलने १०० रुपयांची पातळी ओलांडली आहे.

टॅग्स :महागाईपेट्रोलडिझेलवीज