Join us

घाऊक क्षेत्रातील महागाई वाढून ३.९३ टक्क्यांवर; भाजीपाला, कांद्यामुळे वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 12:38 AM

घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचा दर नोव्हेंबरमध्ये आणखी वाढून ३.९३ टक्के झाला आहे. कांदे आणि हंगामी भाजीपाला महागल्यामुळे महागाईचा पारा चढला आहे. वाणिज्य मंत्रालयाने शुक्रवारी जारी केलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली.

नवी दिल्ली : घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचा दर नोव्हेंबरमध्ये आणखी वाढून ३.९३ टक्के झाला आहे. कांदे आणि हंगामी भाजीपाला महागल्यामुळे महागाईचा पारा चढला आहे. वाणिज्य मंत्रालयाने शुक्रवारी जारी केलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली.जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, घाऊक क्षेत्रातील महागाईचा दर आॅक्टोबरमध्ये ३.५९ टक्क्यांवर होता. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये तो १.८२ टक्के होता. नोव्हेंबरमध्ये कांद्याच्या भावात वार्षिक आधारावर तब्बल १७८.१९ टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसून आले. हंगामी भाजीपाल्याचे भावही ५९.८० टक्क्यांनी वाढले. आॅक्टोबरमध्ये हा दर ३६.६१ टक्के होता. प्रोटिनयुक्त पदार्थांच्या भाववाढीची गती कमी झाल्याचे दिसून आले. अंडी, मांस आणि मासे यांचे भाव ४.७३ टक्क्यांनी वाढले. आदल्या महिन्यात ही वाढ ५.७६ टक्के होती. घाऊक क्षेत्रात खाद्य वस्तूंचा महागाईचा दर ६.०६ टक्के राहिला. आॅक्टोबरमध्ये तो ४.३० टक्के होता. उत्पादित वस्तूंचा महागाईचा दर अल्प प्रमाणात कमी होऊन २.६१ टक्के झाला आहे. आॅक्टोबरमध्ये तो २.६२ टक्के होता. ग्राहक वस्तू निर्देशांकावर आधारित किरकोळ क्षेत्रातील महागाई दर आधीच जाहीर करण्यात आला होता.

टॅग्स :भाज्या