नवी दिल्ली - खाद्य वस्तूंच्या किमती कमी झाल्यामुळे घाऊक क्षेत्रातील महागाईचा दर जुलैमध्ये किंचित कमी होऊन ५.0९ टक्के झाला. जूनमध्ये तो ५.७७ टक्के होता.
वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, घाऊक क्षेत्रातील महागाईचा दर २0१७ च्या जुलैमध्ये १.८८ टक्के होता. घाऊक क्षेत्रातील खाद्य वस्तूंच्या महागाईचा दर जुलैमध्ये घसरून उणे २.१६ टक्के झाला. आदल्या महिन्यात तो अधिक १.८0 टक्के होता.
जुलैमध्ये भाजीपाल्याचे दर १४.0७ टक्क्यांनी घसरले. जूनमध्ये ते ८.१२ टक्क्यांनी वाढले होते. फळांच्या किमतीतही ८.८१ टक्क्यांची घसरण झाली आहे. आदल्या महिन्यात त्या ३.८७ टक्क्यांनी वाढल्या होत्या. डाळींचे दर उणे १७.0३ टक्के
राहिले. आदल्या महिन्यात ते उणे २0.२३ टक्के होते.
इकराच्या प्रधान अर्थतज्ज्ञ अदिती नायर यांनी सांगितले की, भाज्या, फळे, डाळी यांच्या किमती उतरल्यामुळे खाद्यवस्तूंच्या किमती वार्षिक आधारावर तीन महिन्यांच्या खंडानंतर घसरल्या आहेत. मासिक आधारावर आॅगस्टमध्ये किमती वाढत असल्याचा कल दिसून येत आहे. वार्षिक आधारावर आणखी काही महिने दर कमी होत राहतील, असा अंदाज आहे.
घाऊक महागाई मंदावली
खाद्य वस्तूंच्या किमती कमी झाल्यामुळे घाऊक क्षेत्रातील महागाईचा दर जुलैमध्ये किंचित कमी होऊन ५.0९ टक्के झाला. जूनमध्ये तो ५.७७ टक्के होता.
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2018 04:48 AM2018-08-15T04:48:19+5:302018-08-15T04:48:39+5:30