नवी दिल्ली : सप्टेंबरमध्ये घाऊक क्षेत्रातील महागाईचा दर उतरून २.६० टक्के झाला. खाद्य वस्तू आणि भाजीपाल्याच्या किमती उतरल्यामुळे ही महागाई कमी झाली आहे.घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचा दर आॅगस्टमध्ये ३.२४ टक्के होता. त्याआधी सप्टेंबर २०१६मध्ये तो १.३६ टक्के होता. सरकारने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, खाद्य वस्तूंच्या महागाईचा दर सप्टेंबरमध्ये २.०४ टक्के झाला. आॅगस्टमध्ये तो ५.७५ टक्के होता. भाजीपाल्याचा महागाईचा दर ४४.९१ टक्क्यांवरून १५.४८ टक्क्यांवर आला आहे. कांदे मात्र ७९.७८ टक्क्यांवरच होते. अंडी, मांस, मासे या क्षेत्रातील महागाईचा दर ५.४७ टक्के राहिला. उत्पादित वस्तूंचा महागाईचा दर २.४५ टक्क्यांवरून २.७५ टक्क्यांवर गेला. इंधन आणि ऊर्जा क्षेत्रातील महागाई ९.९९ टक्क्यांवरून ९.०१ टक्क्यांवर आली.
घाऊक क्षेत्रातील महागाई घसरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 12:48 AM