Join us

Wholesale Inflation: दिवाळीने मोठा दिलासा दिला! घाऊक महागाई दरात दोन टक्क्यांची घट; ऑक्टोबरचे आकडे जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 3:23 PM

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी नुकतेच यावर भाष्य केले होते. ऑक्टोबरमध्ये महागाई दर कमी होऊ शकतो, असे ते म्हणाले होते. यामागे गेल्या सहा-सात महिन्यांत सरकार आणि आरबीआयने उचललेली पावले कारण असल्याचे ते म्हणाले होते. 

महागाईच्या काळात दिवाळी सणाने मोठा दिलासा दिला आहे. घाऊक महागाई दरात गेल्या दीड वर्षाच्या तुलनेत मोठी घसरण झाली आहे. ऑक्टोबरमधील ठोक महागाई दर 8.39 टक्क्यांवर आला आहे. देशातील ठोक महागाई मार्च 2021 नंतर प्रथमच दुहेरी आकड्यावरून खाली आली आहे. 

२०२१ मध्ये घाऊक महागाई दर हा 7.89 टक्के होता. यानंतर १९ महिन्यांनी ठोक महागाई दर हा एकेरी आकड्यावर आला आहे. ठोक किंमत निर्देशांक (WPI) एप्रिल 2021 ते सप्टेंबर 2022 पर्यंत सलग 18 महिने दुहेरी अंकात राहिला आहे. ऑगस्ट महिन्यासाठी WPI 12.41 टक्क्यांवरून 12.48 टक्क्यांवर दुरुस्त करण्यात आला होता. ऑक्टोबर 2021 मध्ये घाऊक महागाई दर 13.83 टक्के होता.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी नुकतेच यावर भाष्य केले होते. ऑक्टोबरमध्ये महागाई दर कमी होऊ शकतो, असे ते म्हणाले होते. यामागे गेल्या सहा-सात महिन्यांत सरकार आणि आरबीआयने उचललेली पावले कारण असल्याचे ते म्हणाले होते. 

खनिज तेल, धातू, मिश्र धातू उत्पादने (यंत्रसामग्री आणि उपकरणे वगळून), कापड, इतर नॉन-मेटलिक उत्पादनांच्या किंमती कमी झाल्यामुळे ऑक्टोबरमध्ये महागाई कमी झाली, असे यामागे कारण देण्यात आले आहे. 

टॅग्स :महागाई