नवी दिल्ली : देशात ऑनलाइन शॉपिंग जोरात सुरू आहे. कोरोना साथीच्या कालखंडात सुरू झालेली ऑनलाइन शॉपिंगची क्रेझ कमी न होता उत्तरोत्तर वाढलेली दिसत आहे. ऑनलाइन शॉपिंगमध्ये पुरुषांनी महिलांना मागे टाकल्याचे आयआयएम अहमदाबाद यांनी केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.
‘डिजिटल रिटेल चॅनेल आणि ग्राहक : द इंडियन पर्सपेक्टिव्ह’ असे या अहवालाचे नाव आहे. यात भारतीय महिला आणि पुरुषांच्या खरेदीच्या सवयींवर प्रकाश टाकण्यात आला आहे. २५ राज्यांमध्ये सुमारे ३५ हजार जणांची मते यासाठी जाणून घेण्यात आली होती. यात सर्व वयोगटातील महिला आणि पुरुषांचा समावेश होता.
प्रमुख शहरांत महिला आणि पुरुषांच्या खरेदीच्या सवयी कशा आहेत, यावरही अहवालात प्रकाश टाकण्यात आला आहे. ऑनलाईन खरेदी करताना पैसे देण्यासाठी कोणते पर्याय पसंतीचे आहेत, याचाही अभ्यास केला आहे. (वृत्तसंस्था)
ग्राहकांनी खरेदी करताना कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय निवडल्याचे दिसून आले आहे. फॅशनवेअर आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या यात मोठ्या प्रमाणावर समावेश होता.
२,४८४ इतके
सरासरी रुपये पुरुष ऑनलाइन शॉपिंगमध्ये खर्च करतात. ऑनलाइन शॉपिंगमध्ये महिलांकडून केल्या जाणाऱ्या खर्चाच्या तुलनेत हे प्रमाण ३६ टक्क्यांनी अधिक आहे.
जयपूर, नागपूर सारख्या टिअर-२ शहरांत
ग्राहकांनी दिल्ली, चेन्नई सारख्या टिअर-१
शहरांच्या तुलनेत फॅशनवर ६३% जादा खर्च केला.