Lokmat Money > बिझनेस न्यूज > चिमणीच्या जागी कुत्राच का?, ट्विटरवरील लोगो बदलण्याची काय आहे कथा

चिमणीच्या जागी कुत्राच का?, ट्विटरवरील लोगो बदलण्याची काय आहे कथा

ट्विटरमधील हा बदल सध्यातरी केवळ वेब व्हर्जनवर करण्यात आला आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2023 01:31 PM2023-04-04T13:31:14+5:302023-04-04T13:31:56+5:30

ट्विटरमधील हा बदल सध्यातरी केवळ वेब व्हर्जनवर करण्यात आला आहे

Why a dog instead of a sparrow?, What is the story of Twitter's logo change by elon musk? | चिमणीच्या जागी कुत्राच का?, ट्विटरवरील लोगो बदलण्याची काय आहे कथा

चिमणीच्या जागी कुत्राच का?, ट्विटरवरील लोगो बदलण्याची काय आहे कथा

सोशल मीडियातील पॉवरफुल्ल एप असलेलं ट्विटर इलॉन मस्क यांच्या ताब्यात आल्यापासून ट्विटरमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. एकतर 'ब्लू टीक' वापरणाऱ्यांसाठी पैसे द्यावे लागणार आहेत. तर, दुसरीकडे ट्टिटर वापरकर्त्यांना मस्क यांनी आश्चर्याचा धक्काच दिलाय. एलॉन मस्क यांनी थेट ट्विटरचा लोगोच बदलला आहे, मस्क यांनी ट्विट करुन लोगो बदलल्याची माहिती दिली. आजपासून ट्विटरचा लोगो 'ब्लू बर्ड' नसून Doge असणार आहे. हा बदल आजपासून दिसत आहे. मात्र, ट्विटरच्या चिमणीच्या जागी मस्क यांनी डॉगी लाच का स्थान दिले, हा प्रश्न आहे. 

ट्विटरमधील हा बदल सध्यातरी केवळ वेब व्हर्जनवर करण्यात आला आहे. तर, मोबाईल एपवर अद्यापही चिमणीच पाहायला मिळत आहे. एलॉन मस्क यांनी गतवर्षी ४४ अब्ज डॉलरला ट्विटर अकाऊंट खरेदी केले. जगातील सर्वात मोठा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आता मस्क यांच्याकडे आला आहे. त्यामुळे, मस्क यांनीही आता व्यवासायिकदृष्ट्या त्याचा फायदा घ्यायचं ठरवल्याचं दिसून येतं. जर, तुमची आवड एलॉन मस्क आणि क्रिप्टोकरन्सी या दोन्हीमध्ये असेल, तर Dogicone बद्दल तुम्हाला माहिती असेलच. मस्क हे Dogicone चे मिम्सही शेअर करतात. अनेकदा Dogicone ला प्रमोट करण्याचं काम मस्क यांनी केलंय. 

सोमवारी मस्क यांनी ट्विटरवर लोगोत बदल केल्यानंतर डोगीकॉईनचे मुल्यांकन २० टक्क्यांनी वाढलंय. Doge लोगोचा विचार केल्यास मस्कने ट्विट करुन माहिती दिली. त्यात, मी वचन दिल्याप्रमाणे... असं म्हटलंय. या ट्विटसह मस्क यांनी एक मार्च २०२२ चा स्क्रीनशॉटही शेअर केलाय. त्यामध्ये, एका युजर्ससोबत त्यांचा ट्विटरवर झालेला संवाद दिसून येतोय. युजर्संने मस्क यांना ट्विटर खरेदी करण्याचा सल्ला दिला होता. तसेच, ट्विटरचा लोगो बदलून, त्याजागी Dogi रिप्लेस करण्याची विनंतीही केली होती. त्यानुसारच, मस्क यांनी हा बदल केला आहे. Dogicoine प्रमोट करण्याचा हा व्यवसायिक प्रयत्न आहे. 
 

 

Web Title: Why a dog instead of a sparrow?, What is the story of Twitter's logo change by elon musk?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.