Lokmat Money > बिझनेस न्यूज > नवउद्योजकांसाठी व्यवसायाचे वेगळे पॅनकार्ड का? जाणून घ्या...

नवउद्योजकांसाठी व्यवसायाचे वेगळे पॅनकार्ड का? जाणून घ्या...

एकमेव मालकी व्यवसाय प्रकारात सगळ्यात निराशाजनक पैलूंपैकी एक म्हणजे व्यावसायिकांवर येणारे अमर्याद व्यावसायिक दायित्व.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 11:28 AM2023-02-27T11:28:05+5:302023-02-27T11:28:26+5:30

एकमेव मालकी व्यवसाय प्रकारात सगळ्यात निराशाजनक पैलूंपैकी एक म्हणजे व्यावसायिकांवर येणारे अमर्याद व्यावसायिक दायित्व.

Why a separate business PAN card for new entrepreneurs? | नवउद्योजकांसाठी व्यवसायाचे वेगळे पॅनकार्ड का? जाणून घ्या...

नवउद्योजकांसाठी व्यवसायाचे वेगळे पॅनकार्ड का? जाणून घ्या...

- प्रतीक कानिटकर, चार्टर्ड सेक्रेटरी
प्रश्न : मी माझ्या व्यवसायाची नोंदणी प्रॉपरायटेरी कन्सर्न म्हणून केलेली आहे. अशा प्रकारच्या व्यवसाय प्रकारात नक्की कोणत्या प्रकारच्या व्यावसायिक लायबिलिटीज म्हणजेच दायित्वे येऊ शकतात?

एकमेव मालकी व्यवसाय प्रकारात सगळ्यात निराशाजनक पैलूंपैकी एक म्हणजे व्यावसायिकांवर येणारे अमर्याद व्यावसायिक दायित्व. येथे अमर्यादित उत्तरदायित्वाचा अर्थ असा आहे की, जर कंपनी आपले कर्ज अथवा व्यावसायिक देणी यांची परतफेड करू शकत नसेल, तर कर्जदार अथवा सरकारी  विभाग जसे की जी. एस. टी, आयकर विभाग ते वसूल करण्यासाठी व्यवसाय मालकांच्या वैयक्तिक मालमत्ता आणि संपत्तीवर टाच आणून त्याची वसुली करू शकतात. 

व्यावसायिक  देणी, व्यावसायिकाच्या वैयक्तिक मालमत्तेवर कशी टाच आणू शकतात?
जीएसटी आणि डेमोनिटिसीजेशनच्या अंमलबजावणीनंतर पॅन आणि आधार कार्डाची जोडणी करण्यात आली म्हणजेच प्रॉपरायटरच्या पॅन आणि आधार कार्डाला त्याची संपूर्ण वैयक्तिक मालमत्ता जोडली गेली, ज्यामध्ये त्यांचे सेविंग्ज बँक अकाउंट, करंट बँक अकाउंट, फिक्स्ड डिपाॅझिट, म्युच्युअल फंड युनिट्स, एलआयसी पॉलिसी, स्थावर मालमत्ता जसे घर, दुकान आणि जंगम मालमत्ता, सोने, अगदी मोबाइलपर्यंत सगळे काही त्याच्या पॅनला जोडले गेले.

जेव्हा व्यावसायिक एकमेव मालकी व्यवसाय प्रकारात म्हणजेच 
‘प्रॉपरायटेरी कन्सर्न’ म्हणून व्यवसायाची नोंदणी करतो, तेव्हा अशा प्रोप्रायटरशिप फर्मला स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व नसते. कारण ‘अशा व्यवसायाचे वेगळे पॅनकार्ड नसते’ आणि म्हणूनच प्रॉपरायटेरी कन्सर्नचे कोणतेही लायसन्स काढताना  प्रोप्रायटरचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड सोबत जोडावे लागते. उदा : जीएसटी अंतर्गत प्रोपरायटरकडून काही गैर अनुपालन (Non-Compliance/ Default) झाल्यास उद्योजकाची वैयक्तिक मालमत्ता जी त्याच्या पॅन कार्ड आणि आधार कार्डला जोडलेली आहे, ती सगळी जप्त करून   त्यातून जीएसटी कर आणि इतर थकबाकी वसूल केली जाऊ शकते.

...तर मालमत्तेवर जप्ती येऊ शकते
 वैधानिक देय आणि कराराची देयके वसूल करण्यासाठी प्रोपरायटरच्या पॅन कार्ड आणि आधार कार्ड सोबत जोडलेल्या वैयक्तिक मालमत्तेवर जप्ती येऊ शकते. कारण एकमात्र प्रोप्रायटरशिप फर्मला स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व मानले जात नाही. 
 व्यावसायिक नुकसानामुळे मालकी हक्कांवर गदा येऊ शकते व खऱ्या अर्थाने व्यवसाय व्यावसायिकाच्या घरावर येतो. जसजसा व्यवसाय वाढू लागतो, अमर्यादित उत्तरदायित्व हे केवळ कराराच्या आर्थिक दायित्वांपुरते मर्यादित राहत नाही.
 जसे की जर व्यावसायिकाने जीएसटी रिटर्न्स देय तारखेच्या आत न भरल्यास प्रति दिन दंड लागू होतो, तो देखील व्यावसायिकाच्या वैयक्तिक मालमत्तेतून जीएसटी डिपार्टमेंट वसूल करू शकते.  

कौटुंबिक मालमत्ता वाचवा
व्यावसायिकाच्या वैयक्तिक व कौटुंबिक मालमत्तेला व्यावसायिक लायबिलिटीपासून वाचविण्यासाठी कंपनी संरचनेमध्ये प्रायव्हेट लिमिटेड कंपनी अथवा लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप (एलएलपी) सारख्या व्यवसाय प्रणालींना प्राधान्य दिले जाते. ज्यामध्ये व्यवसायाचे वेगळे पॅन कार्ड असल्याने व्यवसायाशी निगडीत दावे मालकाच्या वैयक्तिक मालमत्तांवर येत नाहीत.

Web Title: Why a separate business PAN card for new entrepreneurs?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.