Join us

४० हजार कोटींची संपत्ती असणाऱ्या तरुणाने घेतला सन्यास! ऐशोआरामाच्या जीवनाचा का केला त्याग?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 15:06 IST

buddhist monk : लोक तहानभूक विसरुन पैशामागे धावपळ करत असताना एका तरुणाने वयाच्या १८ व्या वर्षी ४० हजार कोटी रुपयांच्या संपत्तीचा त्याग केला आहे. विशेष म्हणजे या संपत्तीचा तो एकमेव वारस होता.

buddhist monk : सध्याच्या काळात आपल्या आसपास पाहिलं तर प्रत्येकजण पैशाच्या मागे धावताना पाहायला मिळत आहे. मालमत्ता मिळवण्यासाठी लोक रक्ताची नातीही विसरत चालली आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला जर सांगितलं की एका व्यक्तीने ४० हजार कोटी रुपयांच्या संपत्तीवर पाणी सोडले तर विश्वास बसेल का? पण, हे वास्तव आहे. जगातील प्रत्येक पालकाला आपल्या मुलाने त्यांच्यापेक्षा अधिक यशस्वी व्यक्ती व्हावे असे वाटते. व्यापारी, डॉक्टर, नेता किंवा अभिनेता होऊन जगात नाव कमवावं, अशी प्रत्येक आईबापाची इच्छा असते. पण, आम्ही तुम्हाला अशा व्यक्तीबद्दल सांगणार आहोत, ज्याने वारसात मिळणारी ५ अब्ज डॉलर्सची प्रॉपर्टी नाकरली आहे. एकुलता एक असून राजेहाशी आयुष्य नाकारुन तो साधा भिक्षु बनला आहे.

मलेशियातील टेलीकॉम टायकून आनंद कृष्णन यांचा मुलगा अजहान सिरीपान्यो लक्झरी लाइफ सोडून धर्माच्या मार्गावर निघाला आहे. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या मते, आनंद कृष्णन हे मलेशियातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत, त्यांची एकूण संपत्ती ४०,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त (५ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त) आहे. त्यांची आई देखील राजघराण्याशी संबंधित आहे.

मलेशियामध्ये गडगंज श्रीमंतमलेशियामध्ये आनंद कृष्णन टेलिकॉम, मीडिया, तेल, वायू आणि रिअल इस्टेट यांसारख्या व्यवसायात गुंतलेले आहेत. सिरीपान्यो या मोठ्या साम्राज्याचे एकमेव वारसदार होते. पण त्यांनी हे ऐहिक सुख सोडून आपला धर्म निवडला असून त्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, सिरीपान्यो वयाच्या १८ व्या वर्षीच सर्व सुखाचा त्याग करुनबौद्ध भिक्षू बनले

अजहान सिरीपान्यो यांनी थायलंडच्या प्रवासादरम्यान आपल्या आध्यात्मिक प्रवासाला सुरुवात केली. जिथे ते काही वेळापुरते बौद्ध आश्रयस्थानात थांबले होते. या अल्पावधीत त्यांना धर्म आणि जीवनाचे सत्य कळले. यानंतर त्यांनी आयुष्यभर धर्माच्या मार्गावर चालायचे असे ठरवले होते. थायलंड-म्यानमार सीमेजवळ असलेल्या दताओ डॅम मठाचे ते मठाधिपती आहे. 

टॅग्स :व्यवसायपैसालाइफस्टाइल