Join us

canceled cheque: मोठ्या व्यवहारांत ‘कॅन्सल्ड चेक’ का घेतले जातात?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 6:19 AM

what is canceled check use: पैसे हस्तांतरित करण्यासाठी आरटीजीएस, एनईएफटी यासह नेट बँकिंग, मोबाइल बँकिंग, डेबिट व क्रेडिट कार्डे इत्यादी साधने उपलब्ध झाली असली तरी मोठ्या आर्थिक व्यवहारांत अजूनही ‘कॅन्सल्ड चेक’ घेतले जातात. ते का घेतले जातात, याची माहिती आपण जाणून घेऊ या.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : पैसे हस्तांतरित करण्यासाठी आरटीजीएस, एनईएफटी यासह नेट बँकिंग, मोबाइल बँकिंग, डेबिट व क्रेडिट कार्डे इत्यादी साधने उपलब्ध झाली असली तरी मोठ्या आर्थिक व्यवहारांत अजूनही ‘कॅन्सल्ड चेक’ घेतले जातात. ते का घेतले जातात, याची माहिती आपण जाणून घेऊ या.‘कॅन्सल्ड चेक’ घेण्यामागे एक महत्त्वाचे कारण म्हणजे, संबंधितांच्या बँक खात्याची  खात्री करणे. प्रत्येक चेकवर खातेदाराचे नाव, बँकेच्या शाखेचे नाव व पत्ता, खाते क्रमांक आणि एमआयसीआर क्रमांक असतो. याद्वारे संबंधित बँकेत संबंधिताचे खाते आहे, याची खात्री केली जाते. 

कॅन्सल्ड चेक म्हणजे काय?जेव्हा संपूर्ण चेकवर दोन समांतर रेषा काढून त्या रेषांमध्ये ‘कॅन्सल्ड’ असा शब्द लिहिला जातो, तेव्हा तो चेक ‘कॅन्सल्ड चेक’ म्हणून ग्राह्य धरला जातो. चेकवर नुसत्या दोन समांतर रेषा काढल्या; पण त्यामध्ये ‘कॅन्सल्ड’  लिहिले नाही तर तो चेक ‘कॅन्सल्ड’ ठरत नाही. आणखी महत्त्वाची बाब म्हणजे, यासाठी काळ्या किंवा निळ्या शाईचाच वापर करणे आवश्यक आहे. अन्य रंगाची शाई वापरल्यास असा चेक स्वीकारला जात नाही. कॅन्सल्ड चेकवर खातेदाराने स्वाक्षरी करण्याची गरज नसते. या चेकद्वारे खात्यातून पैसे काढता येत नाहीत. 

कशासाठी लागतात ‘कॅन्सल्ड चेक’?गृहकर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्ज घेताना बँकांकडून ‘कॅन्सल्ड चेक’ची मागणी केली जाते. त्याचप्रमाणे विमा पॉलिसी खरेदी करताना, म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करताना संबंधित कंपन्या, असे चेक मागतात. फॉर्ममध्ये ज्याची माहिती देण्यात आलेली आहे, ते बँक खाते संबंधित खातेदाराचेच आहे, हे याद्वारे प्रमाणित केले जाते. ऑफलाइन पद्धतीने पीएफचे पैसे काढण्यासाठीही ‘कॅन्सल्ड चेक’ची गरज लागते. इलेक्ट्रॉनिक क्लीअरन्स सेवेसाठी नोंदणी करतानाही कॅन्सल्ड चेकची आवश्यकता असते.

टॅग्स :बँक