Lokmat Money > बिझनेस न्यूज > महिलांच्या नोकऱ्या का जाताहेत? सव्वा कोटी महिलांनी गमावला रोजगार

महिलांच्या नोकऱ्या का जाताहेत? सव्वा कोटी महिलांनी गमावला रोजगार

गेल्या वर्षात देशात सव्वा कोटी महिलांनी गमावला रोजगार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 06:22 AM2022-05-26T06:22:29+5:302022-05-26T06:23:21+5:30

गेल्या वर्षात देशात सव्वा कोटी महिलांनी गमावला रोजगार

Why are women losing their jobs? A quarter of a crore women lost their jobs | महिलांच्या नोकऱ्या का जाताहेत? सव्वा कोटी महिलांनी गमावला रोजगार

महिलांच्या नोकऱ्या का जाताहेत? सव्वा कोटी महिलांनी गमावला रोजगार

नवी दिल्ली : मागील ५ वर्षांत देशातील सव्वा कोटी महिलांना रोजगार गमवावा लागला आहे. चालू वर्षात जानेवारी ते एप्रिल या ४ महिन्यांच्या काळात २५ लाख महिलांचा रोजगार गेला आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयई) या संस्थेने जारी केलेल्या एका अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

नोकरी जाण्याची कारणे काय?
n प्रसूतीरजा १२ ऐवजी २६ आठवडे केल्याने महिलांना रोजगार देण्यास टाळाटाळ
n समाज अजूनही महिलांना बाहेर जाऊन काम करण्यास प्रोत्साहन देत नाही. 
n स्टार्टअप् कंपन्यांत पुरुषांना प्राधान्य दिले जाते
n बाळंतपणानंतर बहुतांश महिला नोकरी सोडून देतात

कामकाजी महिलांच्या संख्येत घट होण्यामागे ३ प्रमुख कारणे आहेत. समाज अजूनही महिलांना बाहेर जाऊन काम करण्यास प्रोत्साहन देत नाही. स्टार्टअप कंपन्यांत पुरुषांना प्राधान्य दिले जाते आणि बाळंतपणानंतर बहुतांश महिला नोकरी सोडून देतात.    - मदन सबनीस, मुख्य अर्थशास्त्रज्ञ, बँक ऑफ बडोदा  

११.१ कोटी नोकऱ्या २०२२ च्या पहिल्या तिमाहीत जगभरात गेल्या 

१०० महिलांपैकी १२.३ महिलांना कोरोनाकाळात नोकरी गमवावी लागली. 

 

 

Web Title: Why are women losing their jobs? A quarter of a crore women lost their jobs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.