Join us

का आला परकीय चलन साठा १० महिन्यांच्या नीचांकी पातळीवर? विश्लेषकांनी फोडलं RBI च्या माजी गव्हर्नरांवर खापर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 12:23 IST

भारताचा परकीय चलनसाठा १० महिन्यांच्या नीचांकी पातळीवर म्हणजेच ६३४ अब्ज डॉलर्सवर आला आहे. तो आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवरून ७० अब्ज डॉलर्सनं घसरलाय.

भारताचा परकीय चलनसाठा १० महिन्यांच्या नीचांकी पातळीवर म्हणजेच ६३४ अब्ज डॉलर्सवर आला आहे. तो आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवरून ७० अब्ज डॉलर्सनं घसरलाय. प्रसिद्ध बाजार विश्लेषक आणि एसबीआय म्युच्युअल फंडाचे माजी इक्विटी प्रमुख संदीप सभरवाल यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांची धोरणं परकीय चलन साठा कमी होण्यास आणि अर्थव्यवस्थेच्या मंदीला जबाबदार असल्याचं म्हटलंय.

लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

बिझनेस टुडेच्या वृत्तानुसार सभरवाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर आपलं मत व्यक्त केलंय. भारताचा परकीय चलनसाठा १० महिन्यांच्या नीचांकी पातळीवर ६४० अब्ज डॉलर्सवर आला आहे. हा आकडा आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीपेक्षा सुमारे ७० अब्ज डॉलर्सनं कमी आहे. रिझर्व्ह बँकेच्या आधीच्या गव्हर्नरांनी सर्व चलनांच्या तुलनेत डॉलर झपाट्यानं वाढत असताना स्पॉट आणि फॉरवर्ड अमेरिकन डॉलर विक्रीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात परकीय चलनाचा साठा वाया घालवणाऱ्या धोरणांमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं त्यांनी म्हटलं. तसंच दास यांनी विकासदर वाढवून सांगितलं आणि कॅशला मर्यादित ठेवलं आणि त्यांची धोरणं योग्य नव्हती. त्याचेच परिणाम आता देशाला भोगावे लागत असल्याचंही त्यांनी म्हटलं.

दास यांनी कार्यकाळादरम्यान, आरबीआयनं रुपयाची अस्थिरता थांबवण्यासाठी परकीय चलन साठ्याचा मोठा हिस्सा स्पॉट आणि फ्युचर्समध्ये विकला होता, असं ते म्हणाले. अल्पावधीत स्थैर्य आल्यामुळे त्यांच्या या दृष्टीकोनाचं कौतुक झालं आणि दीर्घ परिणामांबाबत टीका ही टीका झाली.

किती आहे परकीय चलन साठा?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ताज्या आकडेवारीनुसार भारताचा परकीय चलन साठा सलग पाचव्या आठवड्यात घसरून ३ जानेवारी पर्यंत ६३४.५९ अब्ज डॉलर्सवर आला आहे. सप्टेंबर अखेरच्या ७०४.८९ अब्ज डॉलरच्या उच्चांकी पातळीवरून हा साठा सुमारे ७० अब्ज डॉलर्सनं घसरलाय.

टॅग्स :शक्तिकांत दासभारतीय रिझर्व्ह बँक