Join us

निखिल कामथ यांचं पॉडकास्ट सोडून अचानक का बाहेर पडले अमेरिकन अब्जाधीश? समोर आलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 12:25 IST

Zerodha Nikhil Kamath : झिरोदाचे सहसंस्थापक निखिल कामत यांचे पॉडकास्ट 'डब्ल्यूटीएफ' (Podcast) ‘WTF’ खूप लोकप्रिय आहे. या पॉडकास्टमध्ये ते वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना बोलावत असतात.

Zerodha Nikhil Kamath: झिरोदाचे सहसंस्थापक निखिल कामत यांचे पॉडकास्ट 'डब्ल्यूटीएफ' (Podcast) ‘WTF’ खूप लोकप्रिय आहे. या पॉडकास्टमध्ये ते वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना बोलावत असतात. नुकत्याच झालेल्या पॉडकास्टमध्ये त्यांनी अमेरिकन अब्जाधीश ब्रायन जॉन्सनला यांना बोलावलं होतं. या पॉडकास्टचा विषय "आरोग्य आणि निरोगीपणा कोणत्या दिशेनं जात आहे" हा होता. परंतु ब्रायन जॉन्सन यांनी वेळेपूर्वीच हे पॉडकास्ट संपवलं.

काय होतं कारण?

पॉडकास्ट वेळेपूर्वीच संपवण्याचं कारण म्हणजे देशातील खराब हवेची गुणवत्ता. ज्यामुळे त्यांनी मुलाखत लवकरच संपवली. आता त्यांनी या संपूर्ण प्रकरणावर आपलं मत मांडलंय.

"हवेची गुणवत्ता खराब असल्यामुळे मी हे पॉडकास्ट लवकर संपवलं. निखिल कामथ हे एक चांगले होस्ट आहेत. मुलाखतीत आम्ही चांगली वेळ एकत्र घालवत होतो. पण नंतर खोलीच्या आत बाहेरची हवा येऊ लागली आणि माझा एअर प्युरिफायरही नीट काम करू लागला नाही, तेव्हा समस्या येऊ लागली. प्रदूषित हवेमुळे भारत दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी पुरळ आणि घशात जळजळ होऊ लागली. रतात खराब हवा इतकी सामान्य झाली आहे की, त्याकडे कोणीही लक्ष देत नाही," असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.

आणखी काय म्हटलं?

"बाहेर इकडे-तिकडे लोक फिरत होते. कोणत्याही चेहऱ्यावर मास्क नव्हता, जो प्रदूषणाचं प्रमाण कमी करतो. जन्मापासूनच मुलं आणि नवजात बालकांना अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात. भारत आपल्या देशातील लोकांना स्वच्छ हवा देऊन कॅन्सरपेक्षाही अधिक लोकांना चांगलं ठेवू शकतो. अमेरिकेत परत आल्यानंतर वायू प्रदूषणाशी निगडीत सर्व समस्या सुटल्या आहेत," असंही ते म्हणाले.

टॅग्स :व्यवसायवायू प्रदूषण