Lokmat Money > बिझनेस न्यूज > जगभरातील देश सोने खरेदी का करताहेत? जाणून घ्या

जगभरातील देश सोने खरेदी का करताहेत? जाणून घ्या

मागील चार वर्षांमध्ये जगातील प्रमुख बँकांकडील सोन्याच्या साठ्यात जवळपास ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2023 04:23 PM2023-05-17T16:23:18+5:302023-05-17T16:23:41+5:30

मागील चार वर्षांमध्ये जगातील प्रमुख बँकांकडील सोन्याच्या साठ्यात जवळपास ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Why do countries around the world buy gold? | जगभरातील देश सोने खरेदी का करताहेत? जाणून घ्या

जगभरातील देश सोने खरेदी का करताहेत? जाणून घ्या

 जागतिक अर्थव्यवस्थेत डॉलर कमकुवत झाल्याने, अनेक देशांच्या परकीय गंगाजळीतून डॉलरचे प्रमाण कमी होत आहे. त्यातच वाढती महागाई आणि जागतिक मंदीच्या भीतीच्या अनेक देशांनी डॉलरला पर्याय म्हणून अन्य उपाययोजना करण्यास सुरुवातही केली आहे. त्यानुसार, अनेक देशांचा सोने खरेदीकडे कल वाढला आहे. मागील चार वर्षांमध्ये जगातील प्रमुख बँकांकडील सोन्याच्या साठ्यात जवळपास ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

डॉलरचे घटते प्रमाण
जगभरातील परकीय गंगाजळीतून डॉलरचे प्रमाण सातत्याने कमी होत आहे. १९९४ नंतर प्रथमच मार्च, २०२२ मध्ये डॉलरचा वाटा ५८ टक्क्यांवर आला आहे. विशेष म्हणजे, २००१ मध्ये हे प्रमाण ७१ टक्क्यांपर्यंत वाढले होते. मात्र, सोने खरेदीकडे कल वाढल्याने डॉलरचे प्रमाण टप्प्याटप्प्याने कमी होत गेले.

गंगाजळीतील सोन्याचा साठा किती?
भारतीय गंगाजळीतही मागील दोन वर्षांत सोन्याचे प्रमाण जवळपास २.२ टक्क्यांनी वाढले आहे. गंगाजळीतील सोन्याचा वाटा हा फेब्रुवारी, २०२३ मध्ये ८.७ टक्क्यांवर (७९४.६ टन) पोहोचला आहे. दरम्यान, मागील दोन वर्षांत भारताने तब्बल ४५६ टन सोन्याची खरेदी केली.  

Web Title: Why do countries around the world buy gold?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.