Join us

RBI गव्हर्नरना पेन्शन का मिळत नाही? रघुराम राजन यांनी केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2023 10:23 PM

गव्हर्नर म्हणून त्यांचा पगार वर्षाला चार लाख रुपये असल्याचेही त्यांनी सांगितले

Raghuram Rajan on Pension: भारतीय रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी नुकतेच सांगितले की गव्हर्नर म्हणून त्यांचा पगार वर्षाला चार लाख रुपये होता. रिझव्‍‌र्ह बँकेच्या गव्हर्नरच्या सध्याच्या पगाराची माहिती नसल्याचेही त्यांनी मान्य केले. आरबीआय गव्हर्नर असताना त्यांना राहण्यासाठी मोठं घर नक्कीच मिळालं हेही ते म्हणाले. महत्त्वाची बाब म्हणजे, RBI गव्हर्नरला मिळणारा पगार आणि पेन्शन बाबत रघुराम राजन यांनी काही गोष्टी सांगितल्या.

राज शमानी यांच्या "फिगरिंग आउट" पॉडकास्टवर बोलताना राजन म्हणाले की, गव्हर्नर होण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यांना धीरूभाई अंबानी यांच्या घराच्या अगदी जवळ असलेल्या एका मोठ्या घरात राहायला मिळाले. राजन म्हणाले की, मला माहिती नाही की सध्या आरबीआय गव्हर्नरचा पगार किती आहे? पण माझ्या काळात हा पगार वर्षाला चार लाख रुपये असायचा. मुंबईतील मलबार हिलवरील धीरूभाई अंबानींच्या घरापासून काही अंतरावर राहण्यासाठी खूप मोठे घरही होते.

पेन्शनबद्दल काय म्हणाले?

६० वर्षीय रघुराम राजन यांनी 2013-2016 दरम्यान RBI गव्हर्नर म्हणून काम केले. त्यांचा पगार कॅबिनेट सेक्रेटरीएवढा असल्याचे त्यांनी पुढे सांगितले. आपल्या कार्यकाळात आपल्याला वैद्यकीय सुविधाही मिळाल्याचे त्यांनी सांगितले. मात्र त्यांना पेन्शन मिळाली नाही. राजन म्हणाले की, मला वाटते की त्यांचा पगार कॅबिनेट सेक्रेटरीएवढा होता. या सेवेत तुम्हाला इतर सुविधा मिळत नाहीत ज्या सरकारी अधिकाऱ्यांना मिळतात, तुम्हाला पेन्शन मिळत नाही. आरबीआयचे गव्हर्नर पेन्शनसाठी का पात्र नाहीत हे स्पष्ट करताना राजन म्हणाले की ते नागरी सेवेत आहेत. त्यांच्या नागरी सेवेतून पेन्शन मिळते. ते म्हणाले की बहुतेक आरबीआय गव्हर्नरना पेन्शन न मिळण्याचे कारण की ते नागरी सेवक होते. त्यामुळे त्यांना त्यांच्या नागरी सेवेतून आधीच पेन्शन मिळत होते. पण एक अधिकारी असाही होता जो सनदी अधिकारी नव्हता, मी त्याचे नाव घेणार नाही… पण RBI आणि सरकारच्या अनेक वर्षांच्या सेवेमुळे तो पेन्शनचा हकदार होता.

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकरघुराम राजननिवृत्ती वेतन