नवी दिल्ली : नोटाबंदी होऊन नऊ महिन्यांचा काळ उलटला, तरी अर्थव्यवस्थेतून परत घेण्यात आलेल्या ५०० आणि १,००० रुपयांच्या नोटा रिझर्व्ह बँक का मोजू शकली नाही, असा सवाल विरोधी पक्षांनी राज्यसभेत उपस्थित केला आहे.काँग्रेस सदस्य आनंद शर्मा यांनी शून्य प्रहरात हा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी सांगितले की, नऊ महिन्यांत बाळही जन्माला येते. परंतु, बाद करण्यात आलेल्या किती नोटा रिझर्व्ह बँकेकडे जमा झाल्या, याचा आकडा देशाला कळू शकत नाही. ही खेदाची बाब आहे. मोदी सरकारने गेल्या वर्षी ८ नोव्हेंबर रोजी ५०० आणि १,००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या. काळा पैसा आणि बनावट नोटा हुडकून काढण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे तेव्हा सांगण्यात आले होते. शर्मा यांनी म्हटले की, आम्ही चंद्र आणि मंगळावर जाण्याची भाषा करीत आहोत; पण तुम्ही साध्या नोटा मोजू शकत नाही. बँकांकडे किती जुन्या नोटा जमा झाल्या, हे देशाला कळायला हवे. रिझर्व्ह बँकेसाठी मी तर नोटा मोजायला जाऊ शकत नाही.
नोटांची मोजणाी अपूर्ण का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 4:31 AM