Join us

ऐन सणासुदीत खाद्यतेल महागलं! 15 लिटर तेलाच्या डब्यासाठी मोजावे लागणार इतके रूपये

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 3:48 PM

Custom Duty On Crude Refined Oils : एकीकडे भाजीपाल्यांचे दर वाढत असताना आता खाद्यतेलाचेही दर वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. केंद्र सरकारने खाद्यतेलाच्या आयातीवर शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे.

Custom Duty On Crude Refined Oils : ऐन सणासुदीत सर्वसामान्यांचा खिसा आणखी थोडा खाली होणार आहे. सरकारने विविध खाद्यतेलांवरील कस्टम ड्युटी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सोयाबीनचे भाव वाढविण्यासाठी केंद्र सरकारने शनिवारपासून खाद्यतेल आयात शुल्कामध्ये २० टक्क्यांनी वाढ केलीय. याचा परिणाम बाजारावर दिसून आला. खाद्यतेलाच्या १५ लिटर डब्याच्या दरामध्ये अडीचशे रुपयांची वाढ झाल्याचं समोर आलंय. एकीकडे भाजीपाल्यांचे दर वाढत असताना आता खाद्यतेलही महागले असल्याने सामान्य नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.

या तेलांवर आयात शुल्क वाढलंपीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, सरकारने कच्चे आणि शुद्ध सूर्यफूल तेलासह इतर काही खाद्यतेलांवरील कस्टम ड्युटी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. अहवालानुसार, कच्चे आणि शुद्ध पाम तेल, सोयाबीन तेल आणि सूर्यफूल बियाणे तेलावर बेसिक कस्टम ड्यूटी (BCD) वाढवण्यात आली आहे.

किती वाढली बेसिक कस्टम ड्यूटी?क्रूड पाम तेल, कच्चे सोयाबीन तेल आणि कच्चे सूर्यफूल बियाणे तेलावरील मूलभूत कस्टम ड्युटीचा दर आत्तापर्यंत शून्य होता. म्हणजे या तेलांच्या आयातीवर कोणतेही आयात शुल्क नव्हते. आता ते २० टक्के करण्यात आले आहे. तर शुद्ध सूर्यफूल बियाणे तेल, शुद्ध पाम तेल आणि शुद्ध सोयाबीन तेलावरील मूळ कस्टम ड्युटीचा दर आता ३२.५ टक्के करण्यात आला आहे. यापूर्वी हा दर १२.५ टक्के होता.

इतनी हो जाएगी प्रभावी शुल्क दरअहवालानुसार, कस्टम ड्युटी वाढल्यामुळे, सर्व संबंधित खाद्यतेलांवरील एकूण प्रभावी शुल्क दर ३५.७५ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. क्रूड पाम तेल, कच्चे सोयाबीन तेल आणि कच्चे सूर्यफूल बियाणे तेलावरील प्रभावी शुल्क दर आता ५.५ टक्क्यांवरून २७.५ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. तर शुद्ध सूर्यफूल बियाणे तेल, शुद्ध पाम तेल आणि शुद्ध सोयाबीन तेलावर प्रभावी शुल्काचा दर आता १३.७५ टक्क्यांवरून ३५.७५ टक्के झाला आहे.

सणासुदीत सर्वसामान्यांना धक्कायेत्या काही दिवसांत देशात सणांची संख्या वाढणार असतानाच विविध खाद्यतेलांवरील कस्टम ड्युटीमध्ये ही वाढ करण्यात आली आहे. आता सप्टेंबर महिना अर्धा उलटून गेला आहे. नवरात्र आणि दसरा सारखे सण पुढच्या महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच ऑक्टोबरमध्ये येत आहेत. त्यानंतर ऑक्टोबरच्या शेवटी दिवाळीचा सण आहे. सणासुदीत खाद्यतेलाचा वापर वाढतो.