भारतात घर खरेदी करताना गृहकर्ज घेणार्या खरेदीदारांसाठी अनेक विमा पॉलिसी उपलब्ध आहेत, ज्यामुळे त्यांना गृहकर्जाशी संबंधित जोखमीपासून संरक्षण मिळतं. परंतु हे समजून घेणं गरजेचं आहे की प्रॉपर्टी इन्शुरन्स हा आवश्यक आहे, तर होम लोन इन्शुरन्स घेणं मात्र ऑप्शनल आहे. तुम्ही तुमच्या लोन अॅग्रीमेंटनुसार विमा घेऊ शकता. हे तुम्हाला अतिरिक्त कव्हरेजसह संरक्षण देखील देतात.होमलोन इन्शुरन्सला मॉर्गेज इन्शुरन्स (mortgage insurance) किंवा मॉर्टगेज प्रोटेक्शन इन्शुरन्स (mortgage protection insurance) असेही म्हणतात. ज्यांना मृत्यूसारख्या अनपेक्षित परिस्थितीमुळे कर्जाची परतफेड करण्यात अडचणी येतात अशा घरमालकांना आर्थिक संरक्षण प्रदान करते.हा विमा होम लोन घेताना किंवा कर्जाच्या कालावधीत कधीही खरेदी करता येतो. विम्याची किंमत कर्जाची रक्कम, कर्जाचा कालावधी, कर्जदाराचे वय आणि आरोग्य आणि कव्हरेजचा प्रकार यासह अनेक घटकांवर अवलंबून असते. होम लोन इन्शुरन्स अनिवार्य नाही हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे.प्रॉपर्टी इन्शुरन्सभारतात होमलोनसाठी प्रॉपर्टी इन्शुरन्स अनिवार्य आहे. तथापि, कर्जदारांना विमा कंपनी निवडण्याचं स्वातंत्र्य आहे आणि ते कोणत्याही कंपनीकडून कव्हरेज घेऊ शकतात. उदाहरणार्थ, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) म्हणते की गहाण ठेवलेल्या मालमत्तेला आग, पूर, भूकंप आणि इतर संकटांपासून ते संरक्षण देते.कोणते आहेत प्रकार?एसबीआय होम लोन पोर्टलनुसार, एसबीआय लाइफ इन्शुरन्स कंपनीद्वारे मुदत विमा ऑफर केला जातो. हे पॉलिसीधारकाला आर्थिक कव्हरेज प्रदान करतं. पॉलिसी कालावधी दरम्यान विमाधारकाचा मृत्यू झाल्यास लाभार्थीला मृत्यू लाभ दिला जातो. टर्म इन्शुरन्स ऐच्छिक आहे. एसबीआय जनरल प्रॉपर्टी इन्शुरन्सदेखील देते.काय आहे फायदे नुकसान?होम लोन इन्शुरन्स खरेदी करायचा की नाही हा निर्णय वैयक्तिक असतो. निर्णय घेण्यापूर्वी सर्व पैलूंचा काळजीपूर्वक विचार करणे आवश्यक आहे.
Home Loan Insurance: होम लोनसोबत इन्शूरन्स का आहे गरजेचा? जाणून घ्या त्याचे फायदे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2023 7:54 PM