Rent Agreement Facts : तुम्ही भाड्याने दिलेल्या घरात राहत असाल किंवा स्वतः तुमचं घर एखाद्याला भाड्याने दिलं असेल. 'भाडे करार' हा शब्द आपल्यासाठी नवीन नाही. भाडेकरू आणि घरमालक यांच्यामध्ये ११ महिन्यांचा 'भाडे करार' केला जातो. हा करार ११ महिन्यांसाठीच का असतो? वर्षभर का नाही? असा विचार तुमच्या मनात आला आहे का? अनेक घरमालक तर मालमत्ता कर वाचवण्यासाठी भाडेकरारच करत नाही. त्यांना हे किती महागात पडू शकतं? हे माहितीय का?
भाडे करार म्हणजे काय?भाडे करार हा घरमालक आणि भाडेकरू यांच्यातील सामंजस्य करार मानला जातो. घरमालक आपली मालमत्ता एखाद्याला मर्यादित काळ राहण्यासाठी किंवा कोणत्याही वापरासाठी भाड्याने देत असतो. त्यासाठी विशिष्ट भाडे निश्चित केले जाते. या करारामध्ये, भाडेकरू आणि घरमालक यांच्यामध्ये निश्चित केलेल्या अटी व शर्थी लिहिलेल्या असतात. या कराराचे नियम दोघांनाही बंधनकारक असतात.
भाडे करार केवळ ११ महिन्यांसाठीच का?घरमालक आणि भाडेकरू यांच्यात लेखी किंवा ऑनलाईन भाडेकरार हा केवळ ११ महिन्यांसाठी केला जातो. याचे कारण कायदेशीर गुंतागुंत आहे. भारतीय नोंदणी कायदा १९०८ च्या कलम १७ (डी) अंतर्गत, देशात एक वर्षापेक्षा कमी कालावधीचे भाडेकरार आणि लीज करारांची नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. यामुळे घरमालकाला नोंदणी शुल्क भरावे लागत नाही.
भाडे करारातील कायदेशीर समस्यादेशातील बहुतेक कायदे भाडेकरूच्या हक्कांचे संरक्षण करणारे आहेत. अशा परिस्थितीत, जेव्हा घरमालक आणि भाडेकरू यांच्यात वाद होतात. अशा वर्षानुवर्षे चालणाऱ्या कायदेशीर लढाईत मालमत्ता भाडेकरुच्या ताब्यातच राहते. परिणामी घरमालकाचे आर्थिक नुकसान होते. भविष्यातील या सर्व अडचणी टाळण्यासाठी घरमालक ११ महिन्यांसाठी भाडे करार करतात.
भाडे वाढवणे हेही कारणभाडे कराराचे नूतनीकरण करण्यावेळी घरमालकाला भाडे वाढवण्याची संधी मिळते. याउलट जर भाडेकरार कायद्यानुसार, भाडे करार ११ महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी केला असेल. अशा परिस्थितीत विवाद झाल्यास न्यायालय भाडेवाढ रोखू शकते.