Apple ने 7 सप्टेंबर रोजी iPhone 14 सीरीज लाँच केली आहे. या सीरीजमध्ये कंपनीने चार नवीन स्मार्टफोन लाँच केले आहेत. यामध्ये त्यांच्या किंमतीही निरनिराळ्या आहे. जर तुम्ही आयफोन 14 सीरीजच्या किमतींकडे पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की भारतात त्यांची किंमत अमेरिकेपेक्षा खूप जास्त आहे. अमेरिकेत आयफोन्सच्या किंमती स्पर्धात्मक आहेत. परंतु भारतात तसं नाही. iPhone SE 2022 ची किंमत आतापर्यंत 43,900 रूपयांना (आता 49900) रूपयांना मिळत होता.
परंतु अमेरिकेत या डिव्हाईसची किंमत जवळपास 32 हजार रूपये आहे. तुलनेनं भारतीय बाजारपेठेत या डिव्हाईसची किंमत 10 हजारांनी अधिक आहे. नुकत्याच लाँच झालेल्या iPhone 14 ची किंमत अमेरिकन बाजारात 799 डॉलर्स (63700 रूपये) पासून सुरू होते. तर भारतात याची किंमत 79900 रूपये इतकी आहे. दोन्ही बाजारपेठांमध्ये 16,200 रूपयांचा फरक आहे. परंतु असं का? भारतात आयफोनची किंमत इतकी जास्त का असा प्रश्न निर्माण होतोय.
काय आहे कारण?
सीएनबीसीच्या रिपोर्टनुसार या प्रकरणाशी निगडीत एका व्यक्तीनं सांगितलं की भारतात iPhone च्या असेंबलीमुळे किंमत कमी होणार नाही. यामागचं कारण म्हणजे कंपोनंट्सवर आताही ओरिजन इक्विपमेंट्स मॅन्युफॅक्चरर्सना अधिक इंपोर्ट ड्युटी द्यावी लागते. आयफोनमध्ये वापरल्या जाण्याऱ्या प्रिन्टेट सर्किट बोर्ड असेंबलीवर (PCBA) जवळपास 20 टक्के इम्पोर्ट ड्युटी लागते. याप्रकारे आयफोनच्या चार्जरवही 20 टक्के इम्पोर्ट ड्युटी लागते. इम्पोर्ट ड्युटीशिवाय स्मार्टफोन्सवर 18 टक्के जीएसटी आकारला जातो. सध्या भारतात iPhone 12 आणि iPhone 13 असेंबल केला जातो.
भारतातस्वस्तहोणारका?
याशिवाय डॉलर आणि रुपयामधील वाढणारं अंतरही किंमतीच्या वाढीस कारणीभूत आहे. यामुळे भारतात जपान आणि दुबईच्या तुलनेत अॅपलचे प्रोडक्ट महाग आहेत. कंपनीसाठी भारत ही मोठी बाजारपेठ आहे. परंतु जोवर याठिकाणी पीसीबीए आणि अन्य कंपोनंन्ट तयार केले जात नाही, तोवर आयफोनसाठी अधिक किंमत मोजावी लागेल. किंमान सध्याच्या इम्पोर्ट ड्युटीच्या नियमांनुसार तरी अशीच परिस्थिती राहिल.