Join us  

Zomato का गुंडाळतोय आपला व्यवसाय? २२५ शहरांतून बाहेर पडली कंपनी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2023 7:11 PM

देशातील आघाडीचे ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म Zomato २२५ शहरांमधून बाहेर पडले आहे. कंपनीने २२५ छोट्या शहरांमध्ये आपले कामकाज बंद केल्याचे जाहीर केले आहे.

देशातील आघाडीचे ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म Zomato नं तब्बल 225 शहरांमधून आपला व्यवसाय गुंडाळला आहे. कंपनीने 225 छोट्या शहरांमध्ये आपले कामकाज बंद केल्याची माहिती दिली. या शहरांची कामगिरी फारशी उत्साहवर्धक नसल्याने कंपनीने हा निर्णय घेतला. Zomato चे तिसऱ्या तिमाहीच्या निकालांनुसार (Zomato Q3 Result) फूड डिलिव्हरी टेक कंपनीच्या तोट्यात वाढ झाली आहे. डिसेंबर तिमाहीत कंपनीला 346.6 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. यापूर्वी कंपनीला मागील तिमाहीत 251 कोटी आणि वर्षभरापूर्वी याच कालावधीत 63 कोटींचा तोटा झाला होता. फूड डिलिव्हरी व्यवसायात घट झाल्याने कंपनीला हा तोटा सहन करावा लागला.

'सध्याची मागणी कमी होणे अपेक्षित नव्हते. याचा परिणाम फूड डिलिव्हरी प्रोसेसच्या नफ्याच्या वाढीवर झाला आहे. परंतु असे असूनही, आम्हाला वाटते की आम्ही आमचे नफ्याचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी योग्य स्थितीत आहोत,’ असे झोमॅटोने आपल्या तिसऱ्या तिमाहीच्या रिपोर्टमध्ये म्हटलेय.

800 पदांसाठी भरतीZomato हे भारतातील सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या फूड डिलिव्हरी अॅप पैकी एक आहे. कंपनीने नफा वाढवण्यासाठी अलीकडेच त्यांचे गोल्ड सबस्क्रिप्शन पुन्हा लाँच केले. विशेष म्हणजे, 225 शहरांमधून बाहेर पडण्याचा निर्णय अशा वेळी आला आहे जेव्हा कंपनी 800 जागांसाठी लोकांची भरती करण्याचा विचार करत आहे.

225 शहरांतून व्यवसाय गुंडाळलाजानेवारी महिन्यात कंपनी 225 शहरांमधून बाहेर पडली असल्याचे त्यांनी आपल्या तिमाही अहवालात सांगितले. डिसेंबर महिन्यात त्यांनी त्यांच्या ग्रॉस ऑर्डर व्हॅल्यूमध्ये 0.3 टक्क्यांचे योगदान दिले होते. गेल्या काही तिमाहींमध्ये या शहरांमधून परफॉर्मन्स उत्साहजनक नव्हता. आमच्या गुंतवणूकीचा पेबॅक पिरिअड स्वीकार्य नव्हता असे आम्हाला वाटत होते, असे कंपनीने म्हटले. 

टॅग्स :झोमॅटोअन्नव्यवसाय