मुंबई :
सामान्य नागरिकांना श्रीमंत होण्याचे स्वप्न दाखवणाऱ्या एलआयसीने गुंतवणूकदारांचे अक्षरश: दिवाळे काढले आहे. शेअरची किंमत ९४९ वरून ६६७ वर आल्याने एलआयसी या वर्षी आशियातील सर्वांत मोठी संपत्ती नष्ट करणारी कंपनी ठरली. एका वर्षात बाजाराचे १७ अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले असून, एलआयसी त्यातील प्रमुख कंपनी ठरली आहे.
घसरणीची कारणे
वाढते व्याजदर
वाढती महागाई
विदेशी गुंतवणूकदारांकडून बाजारातून पैसे काढून घेण्याचे वाढलेले प्रमाण
३०% मोठी घसरण १७ मे रोजी एलआयसी बाजारात सूचीबद्ध झाल्यापासून समभागांमध्ये झाली आहे.
२.७ अब्ज डॉलर्सचा एलआयसीचा आयपीओ यावर्षी आशियातील सर्वांत मोठा नवीन फ्लॉप स्टॉक ठरला
सरकार काय म्हणते?
शुक्रवारी अँकर गुंतवणूकदारांसाठी लॉक-अप कालावधी संपल्यानंतर सोमवारी एलआयसीचे शेअर्स सलग १०व्या सत्रात ५.६ टक्के पर्यंत घसरले. या घसरणीमुळे केंद्र सरकार चिंतेत आहे. अधिकारी म्हणाले की, कंपनीचे व्यवस्थापन या सर्व बाबींवर लक्ष देत असून, भागधारकांचे मूल्य वाढवले जाईल.
आणखी रडवणार?
एलआयसीचे निराशाजनक तिमाही निकाल पाहता समभागांमध्ये आणखी घसरण होऊ शकते. व्यवस्थापनाचा गुंतवणूकदारांशी संवाद गोंधळात टाकणारा आहे. त्यांनी निकालानंतर विश्लेषक कॉल केला नसून, कंपनी कशी वाढवण्याची योजना आखत आहे, तिची रणनीती काय असेल याबद्दल कोणतीही स्पष्टता नाही, असे बाजार तज्ज्ञांनी म्हटले आहे.
शेअर्स विकावा की घ्यावा?
कंपनी फंडामेंटली स्ट्राँग असून, वाढती महागाई व मंदीची भावना याचा फटका शेअर्सला बसत असल्याचे काही तज्ज्ञांनी म्हटले आहे, तर अनेक तज्ज्ञांनी सध्या शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तर सध्या गुंतवणूकदारांनी थांबा आणि पहा हे धोरण स्वीकारले पाहिजे, असे काहींनी म्हटले आहे.
एलआयसी सूचीबद्ध झाल्यापासून बाजार भांडवलाच्या तोट्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. । दक्षिण कोरियाची एलजी एनर्जी सोल्युशन लिमिटेड कंपनी प्रथम क्रमाकांवर