Lokmat Money > बिझनेस न्यूज > एटीएममधून १00च्या नोटा का मिळत नाहीत?

एटीएममधून १00च्या नोटा का मिळत नाहीत?

एटीएममधून १00 रुपयांच्या नोटा मिळत नाहीत आणि केवळ २00, ५00 व दोन हजार रुपयांच्या नोटाच मिळतात, अशा अनेक ग्राहकांच्या तक्रारी आहेत व त्या खऱ्याही आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2020 03:46 AM2020-03-04T03:46:50+5:302020-03-04T07:35:54+5:30

एटीएममधून १00 रुपयांच्या नोटा मिळत नाहीत आणि केवळ २00, ५00 व दोन हजार रुपयांच्या नोटाच मिळतात, अशा अनेक ग्राहकांच्या तक्रारी आहेत व त्या खऱ्याही आहेत.

Why not get 100's Notes from ATMs? | एटीएममधून १00च्या नोटा का मिळत नाहीत?

एटीएममधून १00च्या नोटा का मिळत नाहीत?

बंगळुरू - एटीएममधून १00 रुपयांच्या नोटा मिळत नाहीत आणि केवळ २00, ५00 व दोन हजार रुपयांच्या नोटाच मिळतात, अशा अनेक ग्राहकांच्या तक्रारी आहेत व त्या खऱ्याही आहेत. सध्या वापरात १00 रुपयांच्या दोन आकारांच्या नोटा असल्याने ही समस्या उद्भवत असल्याचे उघड झाले आहे.

एटीएमच्या कप्प्यांत १00, ५00 व दोन हजार रुपयांच्या नोटा ठेवण्यात येतात. त्यापैकी ५00 व दोन हजार रुपयांच्या नोटांचे आकार ठरलेले आहेत. पण सध्या १00 रुपयांच्या जुन्या आणि नव्या नोटा असून, त्यांचे आकार वेगवेगळे आहेत. ज्या एटीएममध्ये केवळ १00 रुपयांच्या नव्या नोटांचा कप्पा आहे, तिथे जुन्या ठेवता येत नाहीत व जिथे जुन्यांचा कप्पा आहे, तिथे नव्या ठेवणे शक्य नाही. त्यामुळे बँकांकडे १00 रुपयांच्या एकाच आकाराच्या म्हणजे नव्या नोटा असतील, तर त्या एटीएममध्ये ठेवल्या जातात. पण त्या अनेकदा पुरेशा नसतात. त्यामुळे त्या लवकर संपतात. तसेच ज्या एटीएममध्ये जुन्या नोटांची व्यवस्था आहे, त्यांच्याबाबतही असेच घडते. परिणामी, एटीएममधून १00 रुपयांच्या पुरेशा नोटा मिळत नाहीत, असे आढळून आले आहे. तसेच विशिष्ट एटीएममध्ये कोणत्या आकाराच्या नोटा ठेवण्याची व्यवस्था आहे, ही माहिती बँकांकडे नाही. त्यामुळे त्यांच्याकडून पाठवल्या गेलेल्या १00 रुपयांच्या नोटा एटीएममधील कप्प्यात मावत नसतील, तर त्या पुन्हा बँकेकडे येतात. परिणामी, त्या एटीएममध्ये १00 रुपयांच्या नोटा ठेवल्याच जात नाहीत. (वृत्तसंस्था)

नव्या नोटा २५% ठिकाणीच देशात असलेल्या सुमारे अडीच लाख एटीएमपैकी २५ टक्के एटीएममध्येच नव्या नोटांसाठीचा कप्पा आहे. उरलेल्या एटीएममध्ये १00 रुपयांच्या जुन्या म्हणजे आकाराने मोठ्या नोटा ठेवण्याची व्यवस्था आहे. एटीएम नेटवर्क प्रोव्हायडर्सना अनेकदा १00 रुपयांच्या नव्या आकाराच्या कमी नोटा उपलब्ध होतात. त्यामुळे प्रत्येक एटीएममध्ये त्या कमी प्रमाणात ठेवल्या जातात. त्यामुळे काहींना १00 च्या नोटा सहज मिळतात; पण अनेकांना त्या मिळतच नाहीत, असे हिताची इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक रुस्तम इराणी यांनी सांगितले.

 

Web Title: Why not get 100's Notes from ATMs?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.