Rs 200 Currency : नोटाबंदीनंतर आणलेली २ हजार रुपयांची नोट रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अलीकडेच बाजारातून बाद केली आहे. आरबीआयने आपला मोर्चा आता २०० रुपयांच्या नोटांकडे वळवला आहे. रिझर्व्ह बँकेने सुमारे १३७ कोटी रुपये किमतीच्या २०० रुपयांच्या नोटा बाजारातून काढून घेतल्याचे वृत्त आहे. रिझर्व्ह बँकेने गेल्या ६ महिन्यांत या सर्व कार्यवाही पूर्ण केल्या आहेत. अशा परिस्थितीत २०० रुपयांच्या नोटेवर हे संकट का आले? असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण होऊ लागला आहे.
आरबीआयने २०० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्या नाहीत. या नोटा बाद करण्याचा कोणता हेतूही नाही. वास्तविक, बाजारातून नोटा परत मागवण्याचे कारण म्हणजे या नोटांचा खराब दर्जा. यावेळी सर्वाधिक दोष २०० रुपयांच्या नोटेवर दिसल्याचे रिझर्व्ह बँकेने आपल्या सहामाही अहवालात म्हटलं आहे. या कारणामुळे बाजारातून १३७ कोटी रुपयांच्या नोटा परत मागवाव्या लागल्या. यातील काही नोटा कुजलेल्या अवस्थेत होत्या तर काही नोटांवर लिहिल्यामुळे चलनातून बाहेर काढाव्या लागल्या होत्या.
गेल्या वर्षी १३५ कोटींना चुनागेल्या वर्षीही रिझर्व्ह बँकेने १३५ कोटी रुपये किमतीच्या २०० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या. तेव्हाही या नोटा घाणेरड्या, फाटलेल्या आणि कुजलेल्या अवस्थेत चलनात होत्या. मात्र, मूल्याच्या दृष्टीने पाहिले तर खराब झालेल्या नोटांची संख्या सर्वाधिक ५०० रुपयांची आहे. २००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर २०० रुपयांच्या नोटांचा वापर वाढल्याचे बँकिंग तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळेच यावेळी २०० रुपयांचे चलन मोठ्या प्रमाणात खराब झाल्याने ते परत मागवण्यात आल्याची माहिती आहे.
500 रुपयांच्या नोटांवर सर्वाधिक खर्चरिझर्व्ह बँकेने आपल्या अहवालात म्हटले आहे की, सर्वाधिक नुकसान झालेल्या ५०० रुपयांच्या नोटा आहेत. गेल्या आर्थिक वर्षात बाजारातून ५०० रुपयांच्या सुमारे ६३३ कोटी रुपये किमतीच्या नोटा परत मागवण्यात आल्या होत्या. या नोटा खराब झाल्यामुळे किंवा फाटल्या गेल्यामुळे परत घेण्यात आल्या. मात्र, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीवर नजर टाकली तर गेल्या वर्षीच्या तुलनेत ५०० रुपयांच्या नोटांची संख्या केवळ ५० टक्के दिसून आली. तुलनेत २०० रुपयांच्या नोटांची संख्या ११० टक्क्यांवर पोहोचली आहे.
कमी किमतीच्या नोटांवरही परिणामखराब झालेल्या नोटांमध्ये केवळ मोठ्या चलनाचा समावेश नाही, तर छोट्या नोटांची संख्याही खूप मोठी आहे. ५ रुपयांच्या केवळ ३.७ कोटी नोटा चलनातून काढल्या आहेत. तर २३४ कोटी रुपये किमतीच्या १० रुपयांच्या नोटा काढण्यात आल्या. त्याचप्रमाणे २० रुपयांच्या १३९ कोटी ( नोटांचे मूल्य) ५० रुपयांच्या १९० कोटी (मूल्य) आणि १०० रुपयांच्या ६०२ कोटी रुपये मूल्य असलेल्या नोटा बाजारातून परत मागवण्यात आल्या आहेत.