Lokmat Money > बिझनेस न्यूज > चांदीला येणार सोन्याचा भाव? लवकरच १ लाखांपर्यंत पोहोचणार; पांढऱ्या धातूचे अचानक का वाढली किंमत

चांदीला येणार सोन्याचा भाव? लवकरच १ लाखांपर्यंत पोहोचणार; पांढऱ्या धातूचे अचानक का वाढली किंमत

Silver Prices : सोने आणि चांदीच्या किमती रोज नवे उच्चाक गाठत आहे. त्यातही चांदीचा वाढता वेग पाहता लवकरच १ लाखांचा टप्पा पार करण्याची शक्यता आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2024 02:30 PM2024-10-27T14:30:30+5:302024-10-27T14:31:21+5:30

Silver Prices : सोने आणि चांदीच्या किमती रोज नवे उच्चाक गाठत आहे. त्यातही चांदीचा वाढता वेग पाहता लवकरच १ लाखांचा टप्पा पार करण्याची शक्यता आहे.

why silver rising prices nearing 1 lakh mcx gold silver rally | चांदीला येणार सोन्याचा भाव? लवकरच १ लाखांपर्यंत पोहोचणार; पांढऱ्या धातूचे अचानक का वाढली किंमत

चांदीला येणार सोन्याचा भाव? लवकरच १ लाखांपर्यंत पोहोचणार; पांढऱ्या धातूचे अचानक का वाढली किंमत

Silver Prices : तुम्हाला सचिन तेंडुलकर आणि सौरभ गांगुली यांची सलामीवीर म्हणून जोडी आठवते का? किंवा जुने व्हिडीओ पाहिले तरी त्यांच्यातील चांगली चढाओढ पाहायला मिळेल. एकाने चौकार किंवा षटकार मारला तर दुसराही संधी मिळाली की मोठा फटका मारत होता. सध्या अशीच चढाओढ सोने आणि चांदीमध्ये पाहायला मिळत आहे. सोन्या-चांदीच्या किमतींनी नवीन उंची गाठली असून, त्यामुळे कमोडिटी मार्केटमध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. सध्याची परिस्थिती पाहता चांदी लवकरच १ लाख रुपयाचा टप्पा पार करेल अशी शक्यता आहे.

बाजार विश्लेषकांचे मत आहे की चांदीचे भाव लवकरच या मानसिक पातळीवर जाऊ शकतात. एमसीएक्स वर डिसेंबर डिलिव्हरीसाठी चांदीची किंमत सुमारे ९२,००० रुपये प्रति किलो आहे. या वर्षअखेरीपर्यंत चांदी १ लाखांचा आकडा गाठू शकते. आंतरराष्ट्रीय बाजारातही चांदीचा भाव प्रति औंस ३१.८५ डॉलरवर स्थिर आहे, तर सोन्याचा भाव २,६६१.२५ प्रति औंस नोंदवला गेला.
 
व्याजदर कपातीचा परिणाम

विश्लेषक जिगर त्रिवेदी यांच्या मते, “आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या किमती या वर्षी ३४% वाढल्या आहेत, तर सोन्याचे दर २९% वाढले आहेत. "यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदरात कपात केल्याने आणि कमकुवत अमेरिकन डॉलरमुळे चांदीच्या किमतीत झपाट्याने वाढ झाली आहे." फेडरल रिझर्व्हकडून अधिक दर कपातीची अपेक्षा चांदीच्या किमती वाढवू शकते.

ईव्ही आणि ग्रीन एनर्जीचा वाढता प्रभाव
चांदीची औद्योगिक मागणी वाढण्याचे प्रमुख कारण म्हणजे इलेक्ट्रिक वाहनांची (EV) वाढती लोकप्रियता आणि हरित ऊर्जा तंत्रज्ञान. ईव्ही आणि सोलर पॅनेलसारख्या तंत्रज्ञानामध्ये चांदीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो, ज्यामुळे त्याची मागणी वाढत आहे. केडिया अ‍ॅडव्हायझरीचे संचालक अजय केडिया यांच्या म्हणण्यानुसार, "सौर पॅनेल आणि विंड टर्बाइनमध्ये चांदीची वाढती मागणी भविष्यात त्याच्या किमतीत आणखी वाढ करू शकते."

सोन्या-चांदीचे घसरते प्रमाण
सोन्या-चांदीचे गुणोत्तर, जे सध्या ८४ च्या आसपास आहे, हे देखील बाजाराच्या स्थितीचे संकेत देते. जर हे प्रमाण कमी असेल तर याचा अर्थ सोन्यापेक्षा चांदीच्या किमती वेगाने वाढत आहेत. व्याजदर आणखी कमी झाल्यास, हे प्रमाण आणखी कमी होऊ शकते, ज्यामुळे चांदीची कामगिरी सोन्यापेक्षा चांगली होईल, असा अंदाज तज्ज्ञांचा आहे.

Web Title: why silver rising prices nearing 1 lakh mcx gold silver rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.