नवी दिल्ली : तुमच्या वाय-फायची गती कमी झाली असेल, तर ते हॅक झाले असण्याची शक्यता आहे. म्हणजे ते दुसराच कोणी तरी वापरत आहे. तुमचे वाय-फाय दुसराच कोणी वापरत असेल, तर रोखणे सोपे आहे. पासवर्ड चोरून किंवा हॅक करून तुमचे वाय-फाय इतर कोणी वापरू शकतो. हे रोखण्यासाठी काही साध्या युक्त्या वापरता येऊ शकतात.
लक्षात ठेवा हे साधे उपाय
वाय-फायसाठी नेहमी मजबूत पासवर्ड ठेवा. नवीन राउटर लावताना नवीन पासवर्ड सेट करा.
‘रिमोट ॲक्सेस’ डिसएबल करू नका. कारण त्यामुळे तुमच्या इंटरनेटवर हल्ला होऊ शकतो.
वाय-फाय सिस्टीम नेहमी अद्ययावत करीत राहा. तसेच फीचर्स आणि सिक्युरिटी फिक्स करीत राहा.
राउटरचे नाव बदलत राहण्याचे कायम लक्षात ठेवा.
बदला पासवर्ड
पासवर्ड बदलण्यासाठी वेब ब्राउजर ओपन करा.
आयपी ॲड्रेस टाइप करा. युझरनेम, पासवर्ड नोंदवा.
वायरलेस सेटिंग्सवर जाऊन पासवर्डच्या जागेत नवा पासवर्ड नोंदवा.
राउटरचे नाव बदलणेही सोपे
राउटरचे नाव बदलण्यासाठी राउटरच्या सेटिंग्सवर जा.
वायरलेस सेटिंग्सवर क्लिक करा.
राउटरचे नाव बदलण्याचा पर्याय येईल. तेथे नवे नाव टाका.
‘राउटर ॲडमिन सेटअप ॲप’चा वापर करून वाय-फाय राउटर कॉन्फिगरला नियंत्रित केले जाऊ शकते.
या ॲपद्वारे तुम्ही राउटरचा वापर करीत नसाल, तरीही त्यासंबंधीची माहिती प्राप्त करू शकता.