Join us

डिझेल वाहनांवर १० टक्के अतिरिक्त GST लावणार का? नितीन गडकरींनीच दिलं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 1:43 PM

गडकरी यांनी डिझेल वाहनांवर १० टक्के अतिरिक्त जीएसटी आकारण्याची शिफारस केल्याचं वृत्त काही ठिकाणी प्रसिद्ध झालं होतं.

Additional 10% GST proposal on diesel vehicles: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी डिझेल वाहनांवर १० टक्के अतिरिक्त जीएसटी आकारण्याची शिफारस केल्याचं वृत्त काही ठिकाणी प्रसिद्ध झालं होतं. यामध्ये यासंदर्भात एक ड्राफ्ट लेटर तयार करण्यात आलं असून अर्थमंत्र्यांकडे डिझेल वाहनांवर जीएसटी वाढवण्याची शिफारस केली जाणार असल्याचं म्हटलं होतं. दरम्यान, यावर नितीन गडकरी यांनी आता स्पष्टीकरण दिलं आहे. 

"डिझेल वाहनांवरील विक्रीवर १० टक्के अतिरिक्त जीएसटीची रिफारस केल्याच्या मीडिया रिपोर्टवर तातडीनं स्पष्टीकरणाची गरज आहे. सरकारकडून सद्यस्थितीत असा कोणताही प्रस्ताव देण्यात आलेला नाही," असं गडकरी म्हणाले. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरून त्यांनी यासंदर्भातील माहिती शेअर केलीये.

२०७० पर्यंत कार्बन नेट झिरो गाठण्यासाठी आणि डिझेल सारख्या घातक इंधनामुळे होणारे वायू प्रदूषणाचा स्तर कमी करण्यासाठी, तसंच ऑटोमोबाईल विक्रीतील झपाट्याने वाढ करण्याच्या आमच्या वचनबद्धतेनुसार, स्वच्छ आणि ग्रीन पर्यायी इंधन सक्रियपणे स्वीकारणं अत्यावश्यक असल्याचे ते म्हणाले. हे इंधन आयाताचा पर्याय, परवडणारे, स्वदेशी आणि प्रदूषणमुक्त असावे असंही त्यांनी स्पष्ट केलंय.शेअर्स आपटलेदरम्यान, मीडिया रिपोर्ट्सनंतर अशोक लेलँड, टाटा मोटर्स आणि महिंद्रा अँड महिंद्राच्या शेअर्समध्ये ४.५ टक्क्यांपेक्षा अधिक घसरण दिसून आली होती. या कंपन्या डिझेल वाहनांचं उत्पादन करतात.

टॅग्स :नितीन गडकरीजीएसटीनिर्मला सीतारामन