Join us

BSNL Budget 2024: BSNL दमदार एन्ट्री घेणार का? सरकारनं अर्थसंकल्पात दिला ₹८९,९१६ कोटींचा मोठा निधी, प्लान काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 2:09 PM

BSNL Budget 2024: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएलसाठी ८२,९१६ कोटी रुपयांची मोठी तरतूद केली आहे. पाहा काय आहे सरकारचा प्लान.

BSNL Budget 2024: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएलसाठी ८२,९१६ कोटी रुपयांची मोठी तरतूद केली आहे. अर्थसंकल्पातील कागदपत्रांनुसार, सरकारनं दूरसंचार प्रकल्प आणि सरकारी दूरसंचार कंपन्यांना एकूण १.२८ लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यातील सर्वाधिक रक्कम बीएसएनएलसाठी देण्यात आली आहे. 

प्रस्तावित एकूण वाटपापैकी एक लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम बीएसएनएल आणि एमटीएनएलशी संबंधित खर्चासाठी आहे. त्यापैकी ८२ हजार ९१६ कोटी रुपयांची तरतूद टेक्नॉलॉजी अपग्रेड आणि रिस्ट्रक्चरिंगसाठी करण्यात आली आहे.

२०२४-२५ च्या अर्थसंकल्पात या मागणीसाठी एकूण निव्वळ तरतूद १,२८,९१५.४३ कोटी रुपये (१,११,९१५.४३ कोटी रुपये अधिक १७,००० कोटी रुपये) आहे. १७,००० कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड बॅलन्समधून घेण्यात आली असून त्याचा वापर दूरसंचार सेवा पुरवठादार, भारतनेट आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंट यासारख्या योजनांसाठी केला जाणार आहे.

पेन्शनसाठीही रक्कम प्रस्तावित

याशिवाय केंद्रीय अर्थसंकल्पात सरकारनं टेलिकॉम डिपार्टमेंटच्या कर्मचाऱ्यांना पेन्शन लाभ देण्यासाठी १७,५०० कोटी रुपयांचा प्रस्ताव दिला आहे. यामध्ये १ एप्रिल २०१४ पासून रुजू झालेल्या एमटीएनएल आणि बीएसएनएल कर्मचार्यांचाही समावेश आहे.

टॅग्स :बीएसएनएलएमटीएनएलअर्थसंकल्प 2024केंद्रीय अर्थसंकल्प 2019