Join us  

लक्झरी कारच घेणार, अद्याप आकर्षण कायम; ऑगस्टमध्ये विकल्या गेल्या २,७१२ गाड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 6:18 AM

ऑगस्ट २०२४मध्ये २,७१२ लक्झरी कारची विक्री झाली. आदल्या वर्षी हा आकडा २,७३५ इतका होता.

नवी दिल्ली : ऑगस्ट २०२४मध्ये भारतात सामान्य कारप्रमाणेच लक्झरी कारची विक्रीही चांगली राहिली, अशी माहिती ‘फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशन’ने (फाडा) दिली आहे. ऑगस्ट २०२४मध्ये भारतात लक्झरी कारची विक्री नगण्य प्रमाणात घसरली.

ऑगस्ट २०२४मध्ये २,७१२ लक्झरी कारची विक्री झाली. आदल्या वर्षी हा आकडा २,७३५ इतका होता. मर्सिडिस, ऑडी, बीएमडब्ल्यू, लँड रोव्हर जग्वार आणि व्होल्व्हो या लक्झरी कार देशात विकल्या जातात. या कंपन्यांच्या गाड्यांना देशात चांगली मागणी राहिल्याचे दिसून आले.फाडाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, मर्सिडीस बेंझच्या सर्वाधिक गाड्या ऑगस्ट २०२४मध्ये विकल्या गेल्या. बीएमडब्ल्यू दुसऱ्या स्थानी राहिली. त्यानंतर जग्वार लँड रोव्हर, व्होल्व्हो आणि ऑडी एजी यांचा क्रमांक लागला.

टॅग्स :कार