Lokmat Money > बिझनेस न्यूज > कोरोना पुन्हा गिळणार का तुमची गुंतवणूक?

कोरोना पुन्हा गिळणार का तुमची गुंतवणूक?

चीनसह जगातील काही देशांमध्ये कोव्हिडची वाढती रुग्णसंख्या ही बाजारातील अस्थिरता आगामी सप्ताहातही कायम राहण्याची शक्यता आहे.

By प्रसाद गो.जोशी | Published: December 26, 2022 10:18 AM2022-12-26T10:18:18+5:302022-12-26T10:19:02+5:30

चीनसह जगातील काही देशांमध्ये कोव्हिडची वाढती रुग्णसंख्या ही बाजारातील अस्थिरता आगामी सप्ताहातही कायम राहण्याची शक्यता आहे.

will corona swallow your investment again know about impact on share market | कोरोना पुन्हा गिळणार का तुमची गुंतवणूक?

कोरोना पुन्हा गिळणार का तुमची गुंतवणूक?

प्रसाद गो. जोशी

चीनसह जगातील काही देशांमध्ये कोव्हिडची वाढती रुग्णसंख्या ही बाजारातील अस्थिरता आगामी सप्ताहातही कायम राहण्याची शक्यता आहे. जगभरातील शेअर बाजारांमध्ये असलेले भीतीचे वातावरण, जागतिक मंदीची वाढती शक्यता आणि गुरुवारी होत असलेली डेरिव्हेटिव्हज व्यवहारांची सौदापूर्ती यामुळे बाजार या सप्ताहातही अस्थिर राहण्याची चिन्हे आहेत.

चीनमधील वाढते कोव्हिड रुग्ण आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे आक्रमक धोरण यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. परिणामी, सेन्सेक्समध्ये १४९२.५२ अंशांची मोटी घसरण झाली. बाजाराने गाठलेल्या उच्चांकांनंतर नफा कमविण्यासाठी विक्रीची अपेक्षा होतीच, पण त्यापेक्षा मोठी घसरण बघावयास मिळाली. निफ्टीमध्येही ४६२.२० अंशांची घसरण होऊन तो १७,८०६.८० अंशांवर बंद झाला. स्मॉलकॅपची घसरण तर २३०० अंशांपर्यंत झाली. परकीय वित्तसंस्थांनीही जोरदार विक्री केली. दीर्घकालीन मुदतीसाठी ही खरेदीची संधी मानली पाहिजे.

सर्वच कंपन्यांचे भांडवली नुकसान

>शेअर बाजारातील दहा अव्वल कंपन्यांचे बाजार भांडवलमूल्य गतसप्ताहामध्ये घटले असून, ते एकूण १.६८ लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे.

> भारतातील प्रथम क्रमांकाची कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजला याचा सर्वाधिक फटका बसला असून, कंपनीचे भांडवल सुमारे ४३ हजार कोटींनी कमी झाले आहे.

> बाजारातील काही कंपन्यांचे भांडवल वाढते तर काहींचे कमी होते. मात्र गतसप्ताहात सर्वच कंपन्यांचे भांडवल कमी झाले असून त्यामुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे.
 
> बाजारातील भारतीय स्टेट बँक, एचडीएफसी बँक, एलआयसी आणि आयसीआयसीआय बँक यांना जोरदार फटका बसला.

> एचडीएफसी या कंपनीचे सर्वात कमी नुकसान झाले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: will corona swallow your investment again know about impact on share market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.