Join us

कच्च्या तेलाचे दर येतील प्रति बॅरल ५ डॉलरपर्यंत?  

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 5:00 AM

सध्या कच्च्या तेलाच्या किमती ६० टक्क्यांनी घसरून २००३ नंतरच्या नीचांकी पातळीवर गेल्या आहेत.

नवी दिल्ली : जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरून ५ डॉलर प्रति बॅरल होऊ शकतात, असा इशारा विश्लेषक संस्थांनी दिला आहे. सध्या कच्च्या तेलाच्या किमती ६० टक्क्यांनी घसरून २००३ नंतरच्या नीचांकी पातळीवर गेल्या आहेत. एप्रिलमध्ये कच्च्या तेलाचे दर आणखी घसरून २० डॉलर प्रति बॅरल होतील, असेही विश्लेषकांना वाटते.गोल्डमॅन सॅश समूहापासून सिटी ग्रुप आयएनसीपर्यंत अनेक संस्थांच्या विश्लेषकांनी कच्च्या तेलाच्या दरात तीव्र घसरण होणार असल्याचे म्हटले आहे. आधीच अतिरिक्त उत्पादन असताना कोविद-१९ विषाणूने जगभर थैमान घातल्याने तेलाची मागणी कमालीची घटली आहे. त्यामुळे किमती सातत्याने घसरत असल्याचे विश्लेषकांनी म्हटले आहे. बुधवारी ब्रेंट क्रूडचे दर १३ टक्क्यांनी घसरून २४.८८ डॉलर प्रति बॅरल झाले होते. मे २००३ नंतरचा हा नीचांक ठरला होता.

टॅग्स :खनिज तेलपेट्रोलभारत